मुंबईच्या चुनाभट्टी पोलीस ठाणे हद्दीत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत.जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.
मुंबईत दिवसा ढवळ्या गोळीबार झाल्याने चुनाभट्टी हादरली आहे.दुपारच्या ३ च्या दरम्यान ही गोळीबाराची घटना घडली.गोळीबार झाल्याने भागात एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आझाद गल्ली चुनाभट्टी भट्टी या रस्त्यावर ही घटना घडली.१६ ते १७ राऊंड फायर झाल्याची माहिती आहे.पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.घटनास्थळी गोळ्यांच्या पुंगळ्या देखील दिसत आहेत.
हे ही वाचा:
जय श्रीराम : प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे रचनाकार सोमपुरा कुटुंबीय
कृषीमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण!
मी देशभक्त की देशद्रोही, हे जनता ठरवेल!
राम लल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी सीताराम येचुरी उपस्थित राहणार नाहीत
मिळालेल्या माहितीनुसार, चुनाभट्टी परिसरातील स्थानिक गुंड असलेल्या पप्पू येरुणकरवर याच्यावर गोळीबार करण्यात आला.अंतर्गत वादातून हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.इतर दोन ते तीन लोकांवरही गोळीबार करण्यात आला आहे.टीव्ही ९ मराठी या वाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, स्थानिक गुंड पप्पू येरुणकर याचा या गोळीबाराच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.तर अन्य दोन तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती आहे.
पप्पू येरुणकर याच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून तो याआधी तुरुंगातही जाऊन आला आहे. तसेच त्याचे अनेक लोकांसोबत जुने वाद आहेत.मात्र, हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिसरात आपल्या ताब्यात घेतला आहे.पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.