बहिणीला आणि आईला छळणाऱ्या पुरुषांना रोखणाऱ्या एका दहावीच्या विद्यार्थ्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना हरियाणातील पलवाल येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर, या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा मुलगा त्याच्या आई आणि बहिणीसोबत गुरुवारी शेणाचे गोळे जमा करत होता. ते घराच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून आलेल्या आठ ते नऊ जणांच्या गटाने या मुलाची आई आणि बहिणीला छळ करण्यास सुरुवात केली. या मुलाने त्यांना तसे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता, या त्यापैकी एकाने या मुलावर गोळी झाडली.
हे ही वाचा:
आसामचे समान नागरी कायद्याच्या दिशेने पाऊल
भारतातून नोकरीसाठी रशियात गेलेल्या तरुणांचा युद्धासाठी वापर!
धक्कादायक! नवजात बाळ रडू नये म्हणून तोंडाला लावली ‘टेप’!
‘राहुल गांधी यांना भेटण्यासाठी १० किलो वजन कमी करण्यास सांगितले गेले’!
स्वतःला या गोळीपासून वाचवण्यासाठी या मुलाने हात पुढे केला. त्यामुळे ही गोळी त्याच्या हाताला लागली. घटनेनंतर हल्लेखोरांनी तातडीने घटनास्थळावरून पलायन केले. या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मुलाने हल्लेखोराला ओळखले असून पोलिस आता त्याच्या मागावर आहेत.