भारतीय लष्कर जवानाचे हात-पाय बांधून त्याच्या पत्नीकडून विषप्रयोग केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नूल गावात घडली आहे. या प्रकरणी जवानाच्या पत्नीसह इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने जवान सुखरूप आहे.
अमर देसाई असे विषप्रयोग झालेल्या जवानाचे नाव आहे. जवान अमर हे सुट्टीवर घरी आले होते. घरी आलेल्या जवानाला त्यांच्या पत्नीने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने विषपाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी आणि तिच्या इतर सहकाऱ्यांनी जवानाचे हात-पाय बांधून तोंडावाटे आणि नाकावाटे विषपाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी अमर जवान यांनी जोरजोरात आरडाओरड सुरु केली. आवाज ऐकून शेजारील नागरिकांनी जवानाच्या घरी धाव घेतली. बंद दरवाजा नागरिकांनी तोडून घरात प्रवेश केला. यावेळी पत्नीच्या साथीदाराने एका नागरिकावर हल्ला करत दोघांनी तेथून पळ काढला.
हे ही वाचा:
राष्ट्रीय सुरक्षेसाठी व्यापक धोरणाची अंमलबजावणी करा
मराठा आरक्षणाकरिता जालन्यात मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरु !
भाजपचे उद्या पुण्यात महाअधिवेशन
पोलिसांनी उद्ध्वस्त केले सेक्स रॅकेट, शेजारच्या मुलींनाच गुंतवले
त्यानंतर नागरीकांनी जवानाला रुगालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जवानाला कोल्हापुरातील शासकीय सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवान अमर यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान, जवानाच्या फिर्यादीवरून पत्नी आणि साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.