धक्कादायक! मृत महिलेच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र!

धक्कादायक! मृत महिलेच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र!

लसीकरणाच्या एका घटनेने कोईम्बतूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची बेजबाबदारपणाची जाणीव करून देणारी एक घटना समोर आली आहे. शहरातील एका मृत महिलेच्या नावाने पूर्ण लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र कोविन वेबसाईटवर जारी करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राचा संदेश तिच्या नोंदणीकृत मोबाइलवर प्राप्त झाल्यावर संबंधित महिलेच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

या घटनेमुळे कोईम्बतूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मृत महिलेच्या कोविड लसीच्या दुसऱ्या डोससह यशस्वीपणे लसीकरण करण्यात आल्याचा संदेश नोंदणीकृत मोबाइलवर आला. मात्र, ही ६७ वर्षीय महिला लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी मृत्युमुखी पडली होती.

महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ९ ऑगस्ट २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला होता. मृत्यूच्या पूर्वी तिचा फक्त एकच डोस पूर्ण झाला होता. आणि आता फक्त एक चुकीचाच संदेश आला नाही तर, कोविन अँपवर पीडितेच्या नावाने संपूर्ण लसीकरण प्रमाणपत्र उपलब्ध होते. हे पाहून कुटुंबियांना धक्का बसला आहे.

हे ही वाचा:

नगरच्या गिर्यारोहकांचा नाशिक मध्ये मृत्यू

‘हा तर कॉन्ट्रॅक्टरची धन करणारा महापालिकेचा अर्थसंकल्प…’

निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात ‘भरीव’ तरतुदी

उज्ज्वल निकम म्हणतात, नितेश राणे प्रकरणाचा निष्कारण फुगा केला गेला!

गेल्यावर्षी देखील नंदुरबार मध्ये अशीच घटना घडली आहे. जयाबेन हरीष पारेख यांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर जयाबेन पारेख यांना करोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, एप्रिल २०२१ रोजी जयाबेन यांचा मृत्यू झाला. जयाबेन यांनी लसीचा दुसरा डोस घेतला नसताना त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचा संदेश त्यांच्या कुटुंबीयांना आला. तसेच, लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्रही जारी करण्यात आले होते.

लसीकरणातील भोंगळ कारभार उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चुकीचा मोबाइल नंबर टाकल्यामुळे प्रमाणपत्र निर्गमित झाले असेल, असा प्रशासनाचे मत आहे.

Exit mobile version