25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरक्राईमनामाधक्कादायक! शाळेच्या भरभराटीसाठी शाळा संचालकांनीच घेतला नरबळी

धक्कादायक! शाळेच्या भरभराटीसाठी शाळा संचालकांनीच घेतला नरबळी

शाळा संचालकासह पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशमध्ये अंधश्रद्धेमुळे एका दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका शाळेत दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. शाळेची भरभराट व्हावी यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी शाळा संचालकासह पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हाथरस येथील शाळेत समृद्धी आणि शाळेचे नाव होण्यासाठी म्हणून काळ्या जादूच्या विधीचा भाग म्हणून एका इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. २२ सप्टेंबर रोजी वसतिगृहाच्या खोलीत तीन जणांनी मिळून मुलाचा गळा आवळून खून केला. ही घटना घडल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे कुटुंबीय शाळेत पोहोचल्यानंतर शाळेचे संचालक पळून गेले. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते.

माहितीनुसार, शाळेच्या भरभराटसाठी इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा काळ्या जादूचा विधी करत बळी देण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र, ही योजाना फसल्यामुळे त्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शाळा मालकाच्या वडिलांना जादूटोणा येत असल्याचा दावा केला जात आहे. त्यांनीच ही मानव बलिदानाची योजना आखल्याचा संशय पोलिसांना आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ६ सप्टेंबर रोजी एका दुसऱ्या मुलासोबत मानव बलिदानाची योजना आखली होती. मात्र, मुलाने पळ काढल्यामुळे ती योजना फसली. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी शाळेच्या पाठीमागील कूपनलिकेजवळ मुलाचा बळी देण्याच्या उद्देशाने आरोपीने पुन्हा काळी जादू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याठिकाणी जात असतानाच मुलाला जाग आल्यामुळे संशयितांनी घाबरून त्याचा गळा आवळून खून केला. या घटनेनंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता शाळेतील कूपनलिकेजवळ धार्मिक विधींच्या वस्तू सापडल्या आहेत. त्यामुळे या गुन्ह्यामागे अंधश्रद्धा आणि जादूटोणा असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

हे ही वाचा : 

“महिलेला कुणी जाणीवपूर्वक पाठविले असेल तर पाहून घेऊ”

हरियाणा काँग्रेसने आपल्या १३ नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

बांगलादेशी पॉर्नस्टार उल्हासनगरात, पोलिसांकडून अटक

आसाम आयईडी प्रकरण: एनआयएकडून उल्फा (आय) च्या कार्यकर्त्याला अटक

अशातच मुलाच्या शवविच्छेदन तपासणीत गळा दाबल्याची लक्षणे आढळून आली आहेत. दरम्यान, हा प्रकार ज्या शाळेत घडला ती शाळा आर्थिक अडचणीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे शाळेची भरभराट व्हावी, हा यामागील हेतू असावा, असा संशय पोलिसांना असून या दृष्टीने आता तपास सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा