अबब! आंध्र पोलिसांनी जाळला दोन लाख किलो गांजा…

अबब! आंध्र पोलिसांनी जाळला दोन लाख किलो गांजा…

आंध्र पोलिसांनी उत्तर किनारी आंध्रमध्ये वाहतुकीदरम्यान विविध ठिकाणांहून जप्त केलेला सुमारे दोन लाख किलो गांजा जाळला आहे. हे भारतातील सर्वात मोठे गांजा नष्ट करण्यापैकी एक ऑपरेशन होते. बाजारात या नष्ट केलेल्या गांजाची किंमत दोनशे कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे.

आंध्र पोलिसांनी सांगितले की, त्यांनी गेल्या काही वर्षांत राज्याच्या किनारी जिल्ह्यांतून जे काही अमली पदार्थ जमा केले होते, ते नष्ट केले आहेत. आंध्र प्रदेश पोलिसांनी १२ फेब्रुवारीला त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर गांजा जाळतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे.

दोनशे कोटींहून अधिक किमतीचा गांजा कसा पेटवून नष्ट करण्यात आला, हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. एवढेच नाही तर पोलिसांना हा कार्यक्रम खूप खास बनवायचा होता आणि म्हणूनच त्यांनी गांजाच्या ढिगाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी रेड कार्पेटची व्यवस्थाही केली होती.

हे ही वाचा:

‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी’

नाना पटोलेंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले

संजय राऊत यांच्या तोंडी ‘बरबाद’ करण्याची भाषा

‘राहुल गांधी हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना’

या कारवाईची माहिती राज्य पोलिसांनी ट्विटरवर दिली आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, ‘आंध्र प्रदेश पोलिसांच्या इतिहासातील ऐतिहासिक प्रसंग. आंध्र प्रदेश पोलिसांनी ड्रग्ज डिस्पोजल कमिटीसह अनकापल्ली कोडुरू येथे दोन लाख किलो गांजा जप्त करून नष्ट करण्याची कारवाई केली आहे.

आंध्र प्रदेशात गेल्या वर्षी १ नोव्हेंबर ते ८ फेब्रुवारी या कालावधीत ऑपरेशन परिवर्तन राबविण्यात आले. ज्या अंतर्गत विविध कारवाया करण्यात आल्या. ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत आतापर्यंत ९ हजार २५१ कोटी रुपयांची शेती उद्ध्वस्त करण्यात आली आहे. राज्यात गांजाची वाढती लागवड आणि तस्करी रोखण्यासाठी पोलीस वेगाने कारवाई करत आहेत. पोलिसांची ही कारवाई चर्चेचा विषय बनली आहे. आंध्र प्रदेश पोलिस इतर राज्यांतील पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाई करत आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये, आंध्र प्रदेश पोलिसांनी गांजाच्या तस्करीच्या आरोपाखाली १६ राज्यांमधून तब्बल ४ हजार ६०६ लोकांना अटक केली.

Exit mobile version