शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांची हत्या

धारदार हत्याराने हल्ला केल्याचे स्पष्ट

शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांची हत्या

एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण बदलत चालले आहे. त्यातच गेल्यावर्षी शिंदे गटात सामील झालेले आणि उपविभागप्रमुख ही जबाबदारी सोपविण्यात आलेले रवी परदेशी यांची हत्या करण्यात आली आहे.

डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आले  पण तिथे त्यांचा मृत्यू झाला.

काही महिन्यांपूर्वीच त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यावेळी चिन्ह आणि नाव शिंदे यांना मिळाले नव्हते पण परदेशी यांनी प्रवेश केल्यावर त्यांना उपविभागप्रमुख हे पद देण्यात आले. त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. जांभळीनाका, बाजारपेठ या विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली.

हे ही वाचा:

उन्हाळ्यात पावसाळ्याची तयारी

शेकापला फटका, धैर्यशील पाटील भाजपात दाखल

मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचे राजीनामे

अँटिलिया स्फोटके,हिरेन हत्याकांड प्रकरणाची लवकरच वेब सिरीज

ही हत्या फेरीवाल्यांशी झालेल्या वादविवादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस वर्तवत आहेत. ठाणे पोलिस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version