राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या

महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी सत्तेत असली तरी यातल्या तिन्ही पक्षांमधले मतभेद हे सातत्याने समोर येत असतात. या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची काही उदाहरणे महाराष्ट्राने पहिली आहेत. पण आता हे वाद खूनासारख्या गुन्ह्यांपर्यंत ताणले गेल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याचा खून केल्याची घटना घडली आहे.

महाराष्ट्रातील मोहोळ भागातून हत्येची ही घटना समोर आली आहे. जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा खून केला आहे. सतीश नारायण क्षीरसागर असे मृत शिवसैनिकाचे नाव आहे. तर या हल्ल्यात विजय सरवदे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

लोणकरच्या कुटुंबियांनाच घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांची भेट

भाईचा बड्डे…पोलीस स्टेशनमध्ये साजरा

“मिल जाएँगे हर मोड़ पर गड्ढे-तालाब”

संजय राठोडना कोणत्याही प्रकारची क्लीन चीट नाही

बुधवार,, १४ जुलै रोजी रात्री ही घटना घडली आहे. मृत सतीश क्षीरसागर आणि विजय सरवदे हे रात्री साडे अकराच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. मोहोळ शहरातील गुरुनाथ मंगल कार्यालय परिसरातून जात असताना एका टेम्पोने सतीशच्या दुचाकीला धडक दिली. यात सतीशच्या जागीच मृत्यू झाला तर विजय सरवदे हा जखमी झाला.

या प्रकरणात पोलिसांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष जनार्दन सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा अनिल फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे व भय्या असवले या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टेम्पोचालक भय्या असवले या तरुणास अटक करण्यात आली आहे. तर बाकीच्यांचा शोध सुरु आहे.

नेमके प्रकरण काय?
मोहोळ मध्ये ४ महिन्यापूर्वी नगर परिषदेच्या निवडणूका पार पडल्या. त्यावेळी बोगस मतदार नोंदणीची घटना समोर आली. सतीश क्षीरसागर याने या विषयी तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांनी कारवाई करून ही नावे वगळली होती. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा रोष होता. त्यातूनच हा गुन्हा घडल्याचे समजते.

 

Exit mobile version