शिवसेना पदाधिकारी शब्बीर शेखची चॉपरचे वार करून हत्या

शुक्रवारी रात्री जवळपास १२ च्या सुमारास चार ते पाच अज्ञात इसमांकडून प्राणघातक हल्ला

शिवसेना पदाधिकारी शब्बीर शेखची चॉपरचे वार करून हत्या

शिवसेनेचा पदाधिकारी शब्बीर शेख याची उल्हासनगर येथे चॉपरचे वार करून हत्या करण्यात आली. वैयक्तिक दुश्मनीतून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा कयास आहे.

शब्बीर शेख हा ३४ वर्षीय असून शिवसेनेचा शाखाप्रमुख होता. २०२१ ला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हिल लाइन पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध मटक्याचा धंदा करत असल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शब्बीर शेख हा जय जनता कॉलनीचा रहिवासी होता. उल्हासनगर ५ मध्ये तो राहण्यास होता. त्याच्या स्वतःच्या मालकीचा मटका क्लब होता. शुक्रवारी रात्री जवळपास १२ च्या सुमारास चार ते पाच अज्ञात इसम त्याच्या मटका क्लबवर आले. त्यांच्या हातात चॉपर होते. ते कळल्यावर शब्बीरने पळण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्याला गाठून चॉपरचे वार करून त्याला ठार मारले. त्याच्यावर ८ ते १० वार करण्यात आले. त्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले पण नंतर त्याला कल्याण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

हे ही वाचा:

पाण्यात पडलेला फोन काढण्यासाठी २१ लाख लीटर पाणी काढून टाकले, अधिकारी निलंबित

गुजरातला शुभमन शकून! तिसरे शतक, ८५१ धावा

‘सारे जहाँसे… ’ लिहिणारे कवी इक्बाल अभ्यासक्रमातून ‘आऊट’

एनआयएने केली यासिन मलिकच्या फाशीची मागणी

खंडणीविरोधी पथकाने त्याच्या मटका क्लबवर छापा टाकला होता आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. महिन्याभरापूर्वी उद्धव ठाकरे गटाचा शहरप्रमुख या क्लबमध्ये शिरला होता आणि तिथे गोंधळ घातला होता. कारण या क्लबमुळे स्थानिकांना बराच मनस्ताप होत होता.

पोलिसांनी यासंदर्भात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आमच्याकडे सीसीटीव्ही फूटेज आहे. हल्लेखोर या क्लबच्या दिशेने चालल्याचे त्यात दिसते आहे. या हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version