30 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरक्राईमनामाशिवसेना खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खानला ईडीकडून अटक

शिवसेना खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खानला ईडीकडून अटक

Google News Follow

Related

शिवसेनेच्या नेत्या भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खानला मनी लाँडरिंगच्या गुन्हयात ईडीने सोमवारी रात्री अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सईद खानच्या अटकेमुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने सोमवारी शिवसेना नेत्या भावना गवळी यांचा निकटवर्ती असलेले सईद खान यांना अटक केली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार सईद खान हे गवळी यांच्या कंपनीचे संचालक आहे. भावना गवळी याच्यावर असलेल्या फसवणुकीच्या आरोपात सईद खान यांचा समावेश असल्याची बोलले जात आहे. सईद खान यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

बस चालकाचे धाडस पडले महागात! बस गेली वाहून

पंजाबमध्ये भाजपाला ‘कॅप्टन’ मिळणार?

धक्कादायक! … स्मशानभूमीत सुरू होती अल्पवयीन मुलीची पूजा

मदतीसाठी तत्पर अग्निशमन दलाच्या ‘फायर बाईक’

 

याबाबत ईडीकडून अधिकृत काहीही माहिती देण्यात आलेली नाही. महत्वाची बाब म्हणजे ईडीने गेल्या महिन्यात शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ वाशिम येथे पाच ठिकाणी छापेमारी केली होती. या छाप्या दरम्यान ईडीने महत्वाची कागदपत्रे जप्त केली. सईद खान यांच्या अटकेमुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

भावना गवळींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासात नुकत्याच झालेल्या अपडेटमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवार, २८ सप्टेंबर रोजी शिवसेनेचे खासदार सईद खान यांना जवळचा सहकारी म्हणून अटक केली आहे. आरोपींना विशेष सावकारी प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सईद खान ‘महिला उत्कर्ष ट्रस्ट’चे संचालक आहेत जे आता एक कंपनी म्हणून कार्यरत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा