शिवसेनेचे औरंगाबादचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. २०१८ मध्ये तोडफोड प्रकरणी त्याचबरोबर पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी जैस्वाल यांना ही शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. एकीकडे मविआ सरकार भ्रष्टाचार प्रकरणात अडकले आहे, तर दुसरीकडे यांचे आमदार तोडफोड प्रकरणात शिक्षा भोगताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
अशोक चव्हाणही नितीन गडकरींच्या प्रेमात
अजय देवगणने ६० कोटीला घेतले नवे घर
मेट्रो घडवणारे फडणवीस राहिले बाजूला, बिघडवणारे मुख्यमंत्री ठाकरे उद्घाटन करत फिरतायत
२० मे २०१९ रोजी औरंगाबाद शहरात दंगल उसळली होती. या दंगलीमध्ये शहरात कमालीचे तणावाचे वातावरण होते. दोन गटांनी शहरातील दुकानांची तोडफोड केली होती. केवळ तोडफोडच नाही तर यावेळी जाळपोळ करण्यातही आली होती. या दंगलीमध्ये व्यापारी वर्गाचे फार मोठे नुकसान झाले होते. औरंगाबाद पोलिसांनी यावेळी प्रकरणामध्ये सहभागी असेलल्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.
ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी प्रदीप जैस्वाल यांनी केली होती. परंतु शहरातील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी पोलीसांनाच दमदाटी केली. तसेच पोलीस ठाण्यात जाऊन खुर्च्या आणि काचांची तोडफोड केली. पोलिसांना शिवीगाळही यावेळी त्यांनी केला. याच आरोपप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपाप्रकरणी पोलीस हवालदार चंद्रकांत पोटे यांनी त्यावेळी फिर्याद दिली होती. तब्बल तीन वर्षानंतर जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आलीये.