शिवसेनेसे हिंगोली येथील आमदार संतोष बांगर यांनी एका पोलिसाला शिवीगाळ करून त्याला अपमानित केल्याचा एक ऑडिओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यात एक गाडी पोलिसांनी अडविल्यानंतर त्या कार्यकर्त्याने आमदार बांगर यांना फोन करून त्याची तक्रार केली. तेव्हा आमदारांनी त्या पोलिसाशी संवाद साधताना त्याला अत्यंत खालच्या भाषेत उत्तर दिले. त्या व्हीडिओनंतर बांगर यांच्यावर महाराष्ट्रातून टीकेची झोड उठली आहे.
यासंदर्भात, भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी घणाघाती टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेने ही राजकीय संस्कृती रुजवलेली आहे. शिवसेनाभवनावर जिथे महिलांवर हात टाकला त्यांचा सत्कार मुख्यमंत्री वर्षावर करतात. मतदार संघातील निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्यांचा सत्कार केला जातो. कंगनाचे घर बेकायदेशीररित्या पाडले जाते. त्यामुळे ही बांगर यांची जी ऑडिओ क्लिप आहे, ती शिवसेनेने जी संस्कृती रुजविली त्याचे मूर्त रूप आहे.
झुंडशाहीची ही संस्कृती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच रुजवली आहे… pic.twitter.com/vhzUHv9Cqd
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 28, 2021
हे ही वाचा:
बस चालकाचे धाडस पडले महागात! बस गेली वाहून
धक्कादायक! … स्मशानभूमीत सुरू होती अल्पवयीन मुलीची पूजा
शिवसेना खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खानला ईडीकडून अटक
…आपल्या भावंडाच्या दुःखाने बेजार मांजर बसून राहिले थडग्याजवळ!
आमदार संतोष बांगर यांच्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये एक कार्यकर्ता बांगर यांना फोन करून त्याची गाडी पकडल्याची तक्रार करतो, तेव्हा आमदार बांगर त्या पोलिसाशी संवाद साधतात. पण त्याच्याशी ते अत्यंत अश्लाघ्य भाषेत बोलून गाडी सोडण्यास सांगतातच शिवाय, त्या कार्यकर्त्याला आपल्या सहकाऱ्यांसह त्या पोलिसाला कुठे जाऊ देऊ नका. त्याला तिथेच थांबवून ठेवा अशी धमकीही देतात.