33 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरक्राईमनामाप्रभादेवीत झालेल्या राड्याप्रकरणी शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांना अटक

प्रभादेवीत झालेल्या राड्याप्रकरणी शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांना अटक

एकनाथ शिंदे यांचे समर्थक संतोष तेलवणे यांच्या तक्रारीनंतर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Google News Follow

Related

शिवसेनाचा बालेकिल्ला असलेल्या दादर, प्रभादेवी परिसरात शनिवार, १० सप्टेंबर रोजी मध्यरात्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमनेसामने आले होते.

शाब्दिक बाचाबाचीनंतर त्यांच्यात हाणामारी झाल्याची माहिती आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केला. यामध्ये विभागप्रमुख महेश सावंत बचावले असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

त्यानंतर दादर पोलिसांनी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे. एकनाथ शिंदे यांचे समर्थक संतोष तेलवणे यांच्या तक्रारीनंतर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड कलम १४३, १४७, १४८, १४९, ३९५, ३२४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत, विनायक देवरुखकर, विपुल ताटकर आदींसह २० ते २५ कार्यकर्ते काठ्या, बांबू, चॉपर घेऊन मारण्यासाठी आल्याचे संतोष तेलवणे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे- ठाकरे समर्थक आमनेसामने, गोळीबार झाल्याचा दावा

‘याकुब मेमनचा भाऊ रौफसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या?’

राहुल गांधींच्या ४१ हजार रुपयांच्या टी शर्टची चर्चा

बद्रिनाथला मुंबईतील भाविकांची कार दरीत काेसळली आणि

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या संतोष तेलवणे यांनी गणेश विसर्जना दरम्यान झालेल्या वादाबाबत फेसबुकवर आणि व्हाट्सएपच्या एका पोस्टमध्ये अपशब्द वापरले होते. त्यावरून झालेल्या वादातून शिवसैनिकांनी संतोष तेलावणे यांना शनिवारी मारहाण केली. या प्रकरणानंतर समाधान सरवणकर यांनी प्रभादेवी सर्कलजवळ गोंधळ घातला. दरम्यान सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप देखील करण्यात आला मात्र, सदा सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा