सचिन वाझेंनी वापरलेला सदरा एनआयएच्या ताब्यात

सचिन वाझेंनी वापरलेला सदरा एनआयएच्या ताब्यात

मनसुख हिरेन यांची हत्त्या आणि उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात तपासाला वेग आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून स्फोटकांप्रकरणी तपास होत आहे. याप्रकरणात एनआयएने निलंबित एपीआय सचिन वाझे यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून एनआयएला महत्त्वाची माहिती मिळत आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांना वाझेंनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एक सदरा जप्त केला आहे. हे दोन्ही सदरे गुन्ह्यात वापरले होते अशी माहिती एनआयएने दिली आहे.

त्यातला एक सदरा मुलुंड टोलनाक्याजवळ केरोसीनने जाळला होता. त्याच ठिकाणी काल वाझे यांना घेऊन एनआयए अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्याशिवाय एनआयएने काल रात्री सचिन वाझेंच्या घराच्या कंपाऊंडमधून एक कार जप्त केली. या कारमध्ये महत्वाचे पुरावे सापडल्याचे सांगण्यात येत आहे. एनआयएकडून आणखी दोन कारचा शोध सुरु आहे.

वाझेंसोबत जो दुसरा व्यक्ती कटात होता त्याचाही शोध लागला असून तो एनआयएच्या ताब्यात आहे. ती व्यक्ती पोलीस दलातील असल्याची एनआयएच्या सूत्रांची माहिती आहे. हा संपूर्ण कट पब्लिसीटीसाठी केला असल्याची माहिती सचिन वाझेंनी एनआयएला दिली होती. मात्र एनआयए याचा सखोल तपास करत आहे.

हे ही वाचा:

उरातला साधेपणा हे मनोहर पर्रिकरांचे वैशिष्ट्य होते

नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधल्या सभेत बोलणार

उत्तराखंडमध्ये रेल्वे अचानक उलट धावली

मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकं प्रकरणात मुंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएच्या तपासाला गती मिळाली आहे. सचिन वाझे यांना ठाणे येथील त्यांच्या घरी एनआयएच्या टीमने आणून काल झाडाझडती घेतली. मध्यरात्रीपर्यंत एनआयएची टीम सचिन वाझे यांच्या घरातच होती. घरातून काही पुरावेही गोळा केले असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Exit mobile version