30 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरक्राईमनामासाईनगर शिर्डी दहशतवाद्यांच्या रडारवर

साईनगर शिर्डी दहशतवाद्यांच्या रडारवर

Google News Follow

Related

साईनगर शिर्डी आता दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांकडून शिर्डीत रेकी केल्याची कबुली देण्यात आली आहे. गुजरात एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे तपासातून समोर आले आहे.

शिर्डी हे आंतरराष्ट्रीय संवेदनशील देवस्थान असल्याने याआधीही साई मंदिराला धमकीचे निनावी पत्र तसेच मेल आले आहेत. मात्र, ही माहिती समोर आल्यावर शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे. दुबई येथील अटक केलेले अतिरेकी मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला, मौलाना गनी उस्मानी यांनी शिर्डीचे मूळचे रहिवासी आणि सध्या दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या एका हिंदी चॅनेलच्या संपादकांच्या शिर्डीतील घरी आणि दिल्लीतील कार्यालयाची रेकी केल्याची कबुली देण्यात आली आहे. या अतिरेक्यांकडे अवैध हत्यारे, विस्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या अतिरेक्यांचे पाकिस्तानस्थित आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याचेही गुजरात एटीएसने म्हटले आहे.

हे ही वाचा:

‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी’

नाना पटोलेंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले

संजय राऊत यांच्या तोंडी ‘बरबाद’ करण्याची भाषा

‘राहुल गांधी हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना’

दरम्यान, यापूर्वीही शिर्डी संस्थानाला धमकीचे फोन आणि मेल आले होते. जगप्रसिद्ध साईमंदिराच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अशातच मोठी यंत्रणा सज्ज आहे. तसेच, दहशतवाद्यांकडून रेकी करण्यात आल्याचं उघड होताच शिर्डीतील सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा