पोर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्रा गुन्हे शाखेच्या कार्यालयात शुक्रवारी सकाळी हजर झाली. गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल कडून शर्लिन चोप्रा हिचा जबाब घेण्यात येत आहे. शर्लिन चोप्रा हिने अटक पूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्याच आठवड्यात उच्च न्यायालयाने शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे या दोघींना २० सप्टेंबर पर्यत दिलासा देत कठोर कारवाई करू नये, असा आदेश गुन्हे शाखेला दिले होते. दरम्यान प्रॉपर्टी सेलने गुरुवारी शर्लिन चोप्राला चौकशी साठी हजर होण्यासाठी समन्स बजावले होते.शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता शर्लिन चोप्रा ही चौकशीसाठी प्रॉपर्टी सेल मध्ये हजर झाली असून तिचा जबाब नोंदवण्यात येत आहे.
एप्रिल महिन्यात शर्लिनने राज कुंद्रावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला होता. शर्लिनने म्हटले होते की, राज कुंद्राने आपल्या घरी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला आपण विरोध केला होता. राज कुंद्रा मात्र ऐकण्यास तयार नव्हता. त्यामुळे आपण त्याला धक्का देत बाथरुममध्ये प्रवेश केला आणि तिथे लपून राहिले.
हे ही वाचा:
या राज्यालाही द्या, भारतीय हॉकीच्या यशाचे श्रेय!
आपात्कालिन वापरासाठी जॉन्सन अँड जॉन्सनकडून देखील अर्ज
अनिल देशमुख प्रकरणात कोण धमकावत आहे सीबीआयला?
निधीअभावी काँग्रेसने खासदारांकडेच पसरले हात
राज कुंद्राला १९ जुलैला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर २७ जुलैपर्यंत त्याला पोलिस रिमांडमध्ये ठेवण्यात आले आहे. ती कोठडी आणखी १४ दिवस वाढविण्यात आली आहे. राज कुंद्राच्या वकिलांनी ही अटक गैर असल्याचे म्हटले असून मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्जही केला आहे. यासंदर्भात आता १० ऑगस्टला सुनावणी होणार आहे.