26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामापाकिस्तानात अत्याचाराचा कहर, विवाहाचा प्रस्ताव नाकारला म्हणून चाटायला लावल्या चपला

पाकिस्तानात अत्याचाराचा कहर, विवाहाचा प्रस्ताव नाकारला म्हणून चाटायला लावल्या चपला

महिलांवरील अत्याचाराचा घृणास्पद प्रकार

Google News Follow

Related

विवाहाचा प्रस्ताव नाकारला म्हणून मुलीला चपला चाटण्यास भाग पाडण्याची घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. या घृणास्पद प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. इतकेच नाही तर फैसलाबादमधील या व्यक्तीने आपल्या मुलीच्या या मैत्रिणाला ओलीस ठेवून तिला लग्नासाठी हाेकार देण्यास भाग पाडल्याचे म्हटले जात आहे.

पीडिता बॅचलर ऑफ डेंटल सायन्सची विद्यार्थीनी आहे. पाकिस्तानमधील फैसलाबाद येथील बेस्ट एक्स्पाेर्टचा मालक शेख दानिश याच्या विराेधात या पीडितेने फैसलाबाद येथील महिला पाेलीस ठाण्यात तक्रार केली. आपला मानसिक आणि शरीरीक छळही करण्यात आल्याचं तिने पाेलिस तक्रारीत म्हटलं आहे.

पीडितेची मैत्रिण अना ही या दानिशची मुलगी. ती पीडितेची शाळेपासूनची मैत्रिण हाेती. पीडिता कधीकधी तिच्या घरी जात हाेती. अनाचे वडिल शेख दानिश याने पीडितेबद्दल आपुलकी दाखवायला सुरुवात केली. तिची तो काळजी करू लागला. त्यानंतर त्याने पीडितेला थेट लग्नाची मागणी घातली. पण तिने त्याला नकार दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

हे ही वाचा:

रोहिंग्यांना फ्लॅट देण्याच्या निर्णयावर नरेंद्र मोदींची फुली

मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून जॅकलिन फर्नांडिसचे नाव

निवडणूक समितीतून गडकरी गेले, फडणवीस आले!

आर्थिक मंदी तीही भारतात ? अशक्य

बंदुकीच्या धाकाने अपहरण

शेख दानिश आणि काही सशस्त्र लोकांनी तिच्या घरात घुसून तिला बंदुकीचा धाक दाखवला आणि शेखुप्रा रोडवरील फैसलाबादच्या आपल्या घरी नेले. तेथे तिला शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ केला. तिचे मुंडन केले आणि भुवया कापल्या आणि त्याच्या आणि त्याच्या मित्रांचे बूट चाटण्यास भाग पाडले. आरोपींनी हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केला आणि नंतर तो सोशल मीडियावर टाकला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा