अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूप्रकरणी आरोपी शिझान खानला शनिवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आहे . शिझानच्या वकिलाने एकूण ४ अर्ज दाखल केले होते. घरातील अन्न, दम्यासाठी तुरुंगात इनहेलरचा वापर , तुरुंगात सुरक्षा आणि केस कापण्याची परवानगी या चार गोष्टींचा अर्जामध्ये समावेश होता. न्यायालयाने औषधे आणि घरचे जेवण देण्याची परवानगी दिली आहे. परंतु २ जानेवारीपर्यंत शिझानचे केस कापले जाणार नाहीत. त्यावर नंतर निर्णय घेतला जाईल. शिझानचे वकील आणि कुटुंब सामान्यांप्रमाणे तुरुंगात त्याची भेट घेऊ शकतात.
शिझानच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, आपले आशील गंभीर प्रकरणात पीडीत आहेत आणि दररोज इन्हेलरचा उपयोग करणे आवश्यक आहे. कुटुंबातील एकमेव वयस्क पुरुष सदस्य असल्याने त्याला निर्णय घेण्यासाठी कुटुंब आणि सदस्यांची भेट मिळणे आवश्यक आहे. या प्रकरणी सध्या सुनावणी सुरु आहे.
कोर्टात पोलिसांकडून शिझानच्या कोठडीत वाढ करण्यात आली, मात्र कोर्टाने पोलिस कोठडी देण्याऐवजी साधारणत: १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यानंतर कुटुंबीय जामिनासाठी अर्ज करू शकतात. मात्र, ज्या कलमात गुन्हा दाखल आहे, त्या कलमात जामीन देण्याचा अधिकार दंडाधिकारी न्यायालयाला नाही. त्यामुळेच आता हे कुटुंब सोमवारी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहे.
हे ही वाचा:
निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?
ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश
स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?
तुनीषाचा २४ डिसेंबर रोजी तिच्या दास्तान-ए-काबुलच्या कार्यक्रमाच्या सेटवर मृतावस्थेत आढळून आली होती. त्यानंतर तिचा सहकलाकार झिशान खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. १५ दिवसांपूर्वी शीझान खान आणि तुनिशा यांचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आले होते.