आपला पाठलाग केला गेला; शीतल म्हात्रेंनी केली तक्रार

पोलिसांकडून घेतली गेली दखल, सुरक्षा पुरविण्यात येण्याची शक्यता

आपला पाठलाग केला गेला; शीतल म्हात्रेंनी केली तक्रार

शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी आपला पाठलाग केला गेल्याची तक्रार केली असून त्यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यामुळे शीतल म्हात्रे व्हीडिओ व्हायरल प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या घटनेनंतर म्हात्रे यांना सुरक्षा उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. दहिसर आणि समता नगर पोलीस ठाण्यात म्हात्रे प्रकरणात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

पहिला गुन्हा शीतल म्हात्रे यांनी स्वतःहून दहिसर पोलीस ठाण्यात केला आहे, त्यानंतर दुसरा गुन्हा समता नगर पोलीस ठाण्यात महिला पदाधिकारी यांनी दाखल केला तिसरा गुन्हा आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राजू सुर्वे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

शीतल म्हात्रे या सोमवारी दुपारी मुंबई पोलीस आयुक्तलयात आलेल्या होत्या, त्यांनी सहपोलिस आयुक्त (कावसु) सत्यनारायण चौधरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले, निवेदनात त्यांनी मोटारसायकल वर दोन जण आपला पाठलाग करीत होते, असे म्हटले आहे, शिवाजी पार्क पर्यत या दोघांनी पाठलाग केला होता असे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी तपास करण्यात येणार येत आहे.

हे ही वाचा:

अनंतनागमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी तळ उद्ध्वस्त

राज्यातील कैद्यांना आता ‘तुुडुंब’वास; सगळ्या तुरुंगात गर्दी

शीतल म्हात्रे व्हिडीओ व्हायरल प्रकरण एसआयटीकडे देणार

भारतातील परिवाराची संकल्पना वेगळी; केंद्र सरकार समलैंगिक विवाहाविरोधात

शीतल म्हात्रे यांनी दाखल केलेल्या गुन्हयात आता पर्यत ४ जणांना अटक करण्यात आली आहे ¡)अशोक मिश्रा ¡¡)मानस कुंवर ¡¡¡) विनायक डायरे (कल्याण) ¡v) रवींद्र चौधरी या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने १५ मार्च पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे, दरम्यान दहिसर पोलिसांनी ठाकरे गट युवा सेना कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, चौकशी नंतर त्यांचा जबाब नोंदवून सोडण्यात आले. व्हायरल व्हिडीओ प्रकरणात दाखल झालेले गुन्हे एकत्र करून तपासासाठी विशेष पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार असून या एसआयटीचे प्रमुख महिला पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकारी असणार आहे.

Exit mobile version