शीतल म्हात्रे व्हिडीओ व्हायरल प्रकरण एसआयटीकडे देणार

विनायक डावरे हा ठाकरे गटाचा स्टेट सोशल मीडिया कॉर्डिनेटर असून त्यांने संबंधित व्हिडिओ हा मातोश्री च्या फेसबुक पेजवर अपलोड केला आहे.

शीतल म्हात्रे व्हिडीओ व्हायरल प्रकरण एसआयटीकडे देणार

शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांच्या अश्लील व्हिडीओ व्हायरल प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठी घोषणा विधान सभेत केली आहे. या प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात विधानसभेत सविस्तर निवेदन केले आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात मुळापर्यंत जाऊन याचा मुख्य सूत्रधार शोधणे व सदरचा प्रकार कोणाच्याही बाबतीत होऊ नये यासाठी सीनियर आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करून त्यांच्या मार्फत या गुन्ह्याचा पुढील तपास केला जाईल, अशी घोषणा शंभूराज देसाई यांनी केली.

विधिमंडळात शीतल म्हात्रे यांच्या अश्लील व्हिडीओ व्हायरल प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले. महिला आमदारांनी हा मुद्दा उचलून धरला.शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांचा व्हि़डिओ मॉर्फिंग प्रकरणात नेमकं कोण जबाबदार आहे, त्याच्यावर कठोर कारवाई करा, यासाठी एसआयटी नेमा अशी मागणी आज विधानसभेत करण्यात आली. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज संपेपर्यत सभागृहात निवेदन देणायचे आदेश सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत निवेदन सादर केले.

शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओत अशोभनीय बदल करून तो सोशल माध्यमातून अपलोड केला. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातली एक आरोप ठाकरे गटाशी संबंधित आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मंत्री देसाई म्हणाले, आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलेले आहे. आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. विनायक डायरे हा ठाकरे गटाचा स्टेट सोशल मीडिया कॉर्डिनेटर असून त्यांने संबंधित व्हिडिओ हा मातोश्री फेसबुक पेजवर अपलोड केला आहे. इतर आरोपींनी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ जाणीवपूर्वक काही व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल करून त्यांच्या फेसबुक पेजवर देखील व्हायरल केला आहे.

सदरचे कृत्य गंभीर असून तपासाकरता सायबर सेल आणि इतर पोलीस अधिकारी यांची सहा पथक बनवण्यात आली आहेत. सदर गुन्ह्याच्या तपासात त्याच्या मुळापर्यंत जाऊन सदर गुन्ह्यातील सूत्रधार शोधणे सदरचा प्रकार कोणाबाबत बाबतीत घडू नये अशा प्रकारांना पूर्ण आळा बसावा या दृष्टीने सखोल तपास करण्यात येत आहे याप्रकरणी सीनियर आयपीएस अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करून त्यांच्यामार्फत या गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

हेही वाचा :

सौदी अरेबियात नमाजसाठी लाऊडस्पीकर बंद, या अटी पाळा!

ऑस्कर विजेती ४० मिनिटांची डॉक्युमेंट्री द एलिफन्ट…बनली ४५० तासांच्या फूटेजमधून

नाटू-नाटू, द एलिफन्ट व्हिस्परर्सने रचला इतिहास, भारताला मिळाले दोन ऑस्कर

दिलासा.. कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान

या चार जणांना अटक

अशोक राजदेव मिश्रा ( ४५ ), अनंत कुवर ( ३० ), विनायक भगवान डावरे (२६ ) आणि रवींद्र बबन चौधरी ( ३४ ) या चार आरोपीना अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयाने या आरोपींना १५ मार्च 2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यामध्ये चार मोबाईल हँडसेट व पाच मायक्रो सिम कार्ड जप्त केली असून अधिक चौकशी करण्यात येत आहे.

Exit mobile version