केरळच्या थिरुवनंतपूरमचे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या सहायकाला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. सोन्याच्या तस्करीप्रकरणी ही अटक झाली आहे. मर्यादेपेक्षा अधिक सोने जवळ बाळगल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ते दुबईहून परतत होते. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
शशी थरूर यांचे सहायक शिव कुमार यांना ते दुबईहून परतत असताना दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आल्याचे सीमा शुल्क विभागाने स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी शिव कुमार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सोने जप्त केले आहे. तसेच, त्यांच्याकडून जप्त केलेल्या सोन्याशी संबंधित कागदपत्रेही मागितली आहेत. तसेच, या प्रकरणी चौकशीलाही सुरुवात करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
तरुण अभिनेत्रीचा मल्याळम चित्रपट दिग्दर्शक ओमर लुलू विरुद्ध बलात्काराचा गुन्हा
अरविंद केजरीवाल यांचे खोटे पुन्हा उघड
प्रवाशांचे होणार मेगा हाल! मध्य रेल्वेवर ६३ तास आणि ३६ तासांचे दोन मेगाब्लॉक
डॉ. बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल
सीमा शुल्क विभागाने शिव कुमार यांच्याकडून तब्बल ३० लाख रुपये किमतीचे सोने जप्त केल्याचे म्हटले जात आहे. आता त्यांच्यावर पुढील कारवाईला सुरुवात केली जाईल, असे सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर, काहींच्या मते परदेशातून आलेल्या व्यक्तीकडून सोने घेत असताना त्यांना अटक करण्यात आली आहे.