शेअर्स मार्केट घोटाळा, मध्यप्रदेशातुन तिघांना अटक

३ लाख जणांचा मोबाईल डेटा जप्त

शेअर्स मार्केट घोटाळा, मध्यप्रदेशातुन तिघांना अटक

‘ऑनलाईन शेअर्स ट्रेंडिंग’ घोटाळा प्रकरणात माटुंगा पोलिसांनी मध्यप्रदेश येथील बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून ३ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या या तिघांकडे ३ लाख नागरिकांचा मोबाईल डेटा, आणि १६ मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि राऊटर हे साहित्य मिळून आले आहे. या टोळीने शेकडो नागरिकांची शेअर्स मार्केटिंगच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

राज बहाद्दूर रामसिंग भदोरीया (६२), अंकित उर्फ राजकुमार श्रीराम शिंदे (३०) आणि संजय भगवानदास बैरागी (२८) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघे मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन आणि इंदोर शहरात राहणारे आहेत. माटुंगा येथे राहणारे चंद्रशेखर तावरे (५६) यांना शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तावरे यांची ८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती.

या प्रकरणी तावरे यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला, सायबर गुन्हेगारांनी फसवणूकीची रक्कम घेण्यासाठी तक्रारदार यांना देण्यात आलेले बँक खात्याचा तपास केला असता मध्यप्रदेश येथील राज बहाद्दूर भदोरीया याचे असल्याचे तपासात समोर आले. या खात्यावरील रक्कम काढण्यासाठी मुंबईत आलेल्या राज भदोरीया याला मुंबई विमनातळा वरून अटक करण्यात आली.

हे ही वाचा :

लेबनानचा उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ला

मांस-मटन खाण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांकडून ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांची पाठराखण

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात गोळीबार; चार जण ठार

बंगळूरू कॅफे ब्लास्टमागील आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

भदोरीया यांच्याकडे केलेल्या कसून चौकशीत मध्य प्रदेश राज्यातील उजैन इंदोर येथे फसवणुकीची सपोनि. दिगंबर पोवार यांच्या पथकाने मध्यप्रदेश उजैन येथील एका बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून अंकित आणि संजय बैरागी या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांजवळून पोलिसांनी १६ मोबाईल फोन, मोठ्या प्रमाणात सिम कार्ड मिळून आले आहे.तसेच धक्कादायक बाब म्हणजे या दोघांकडे ३ लाख नागरिकांचा मोबाईल डेटा मिळून आला असून त्यांना हा डेटा कुठून मिळाला याबाबत तपास सुरू असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. या त्रिकूटाने शेकडो जणांची या बोगस शेअर्स मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे.

Exit mobile version