“उदयपूर हत्या घटनेनंतर स्वा. सावरकरांचे विचार आठवतात”

“उदयपूर हत्या घटनेनंतर स्वा. सावरकरांचे विचार आठवतात”

राजस्थानमधील उदयपूरमध्ये काही दिवसांपूर्वी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची तलवारीने गळा चिरून हत्या करण्यात आली. हल्लेखोर मंगळवार, २८ जून रोजी भरदिवसा दुकानात घुसले आणि तलवारीने त्याच्यावर अनेक वार करून त्याचा गळा चिरला. आरोपींनी घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

यानंतर मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी उदयपूर हत्या प्रकरणाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. शरद पोंक्षे यांनी यांनी वि. दा. सावरकर यांनी लिहिलेल्या काही ओळींचा फोटो शेअर केला आहे. “प्रेयसीच्या केसातून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरुन फिरु लागली तर आणि तरच कदाचित हा हिंदुस्तान जगू शकेल,” असं शेअर करत शरद पोंक्षे यांनी यांनी म्हटलंय की, “जे उदयपूरमध्ये घडलं ते पाहिल्यावर स्वा. सावरकर आणि त्यांचे विचार पदोपदी आठवतात. हिंदूंनो जागे व्हा.”

हे ही वाचा:

बहुमत चाचणीत मनसेचा भाजपाला पाठिंबा

डोंबिवलीच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

आम्ही उद्या मुंबईत येणार; कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य

किशोरी पेडणेकरांना पून्हा त्याच नावाने धमकीचे पत्र

राजस्थानमधील उदयपूर येथे एका शिवणकाम व्यावसायिकाची काल हत्या करण्यात आली. त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारीने वार केले आणि या हल्ल्याची चित्रफीत बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यामुळे खळबळ माजली होती. कन्हैया लाल तेली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांचे उदयपूरमधील धनमंडी येथे कपडे शिवण्याचे दुकान होते.

Exit mobile version