24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामासीरियामधील व्यक्तीला भेटण्यासाठी साकिबला पडघ्यात पाठवलं

सीरियामधील व्यक्तीला भेटण्यासाठी साकिबला पडघ्यात पाठवलं

आयसीस मॉड्यूल प्रकरणी एनआयएच्या तपासातून महत्त्वाची माहिती उघड

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील भिवंडीमधील पडघा गावातील आयसीस मॉड्यूल प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केलेल्या साकिब नाचण याच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे उघडकीस आले आहेत. या मॉड्यूलचा सीरियाशी संबंध असल्याची बाब यापूर्वी उघडकीस आली होती. त्यानंतर सीरियामधील एका व्यक्तीला साकिबला भेटण्यासाठी पाठवलं होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच एनआयएने कर्नाटक आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापे मारले होते. त्या दरम्यान भिवंडीतील पडघा गावाजवळील बोरिवली गावामध्ये एक मोठं ऑपरेशन एनआयएतर्फे राबवण्यात आलं होतं. या कारवाई दरम्यान, जवळपास १५ जणांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील आयसीस मॉड्यूलचा नेता साकिब नाचण यालाही अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून अनेक महत्वाचे खुलासे झाले आहेत.

परदेशात लपलेल्या काही हँडलर्सनी सीरियामधून एका व्यक्तीला साकिब नाचण याची भेट घेण्यासाठी पडघ्यातील बोरिवली गावात पाठवलं होतं. तेथे त्या दोघांची भेट झाली होती. येत्या काळात आयसीस मॉड्यूल कसं मोठं करायचं आणि घातपाताच्या कारवाया कशा आणि कुठे करायच्या यासंदर्भात त्या दोघांमध्ये चर्चा झाली होती, अशी माहिती एनआयएच्या चौकशीतून समोर आली आहे.

मात्र, सीरियामधून आलेली ती व्यक्ती कोण होती आणि परदेशात लपलेले हँडलर्स कशा पद्धतीने हे आयसिस मॉड्यूल हँडल करत होते, याचा तपास एनआयए कडून सध्या करण्यात येत आहे. येत्या काळात आणखी कारवाई होऊ शकते.

साकिब नाचण याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आयसिस मॉड्युलमध्ये आपला कुठलाही सहभाग नसून आपण अशा कुठल्याची संघटनेसाठी काम करत नसल्याचं त्याने चौकशीत सांगितलं आहे. “मी माझ्या समाजासाठी आणि अल्लाहसाठी एकनिष्ठ राहिलो आहे आणि त्यासाठीचं गणला जाईन. माझ्या समाजामध्ये माझी प्रतिष्ठा तशीच राहील,” असेही नाचण म्हणाला.

दरम्यान, साकिब नाचण याचं कुठलंही बँक अकाऊंट नसल्याचंसुद्धा समोर आलं आहे. तो रिअल इस्टेटचा व्यवसाय करायचा आणि त्याद्वारे महिन्याला त्याला २ ते ३ लाख रुपये मिळायचे. हेच पैसे या आयसीस मोड्यूलच्या आतंकवादी, दहशतवादी कारवायांसाठी वापरले जाणार होते. त्यासाठी लागणारी साधनसामग्री खरेदी करण्यासाठी तो हे पैस वापरत होता, असंही एनआयएच्या चौकशीतून समोर आलं आहे.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदेंची अधिवेशनात तुफान फटकेबाजी; विरोधक क्लीन बोल्ड

पुजाऱ्याच्या हत्येचे कारण झाले स्पष्ट…

पंजाबचा गँगस्टर अमृतपाल सिंगला पोलिसांनी घातल्या गोळ्या, दोन पोलीस जखमी!

संतापजनक! मुंबईत ६४ वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपीला ठोकल्या बेड्या

साकिबने हे सर्व आरोप फेटाळले असले तरी आयसिस मॉड्यूलचा नेता म्हणून तो काम करत होता. अनेक नव्या तरूणांना या आयसिस मॉड्यूलमध्ये भरती करण्याचं काम त्याच्याकडे होतं. अनेक मुस्लिम तरूणांना पडघा गावात आणून तेथे त्यांच्या राहण्याची सोय करण्याकडे त्याचं लक्ष होतं, असंही एनआयएच्या तपासातून समोर आलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा