क्रूझवरील पार्टीत घातलेल्या छाप्यात सापडलेला शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान हळूहळू जमिनीवर येऊ लागला आहे. एनसीबीच्या कोठडीत असताना त्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना शब्द दिला आहे.
क्रूझ ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानच एनसीबीच्या कोठडीत असताना समुपदेशन करण्यात आलं. त्यावेळी त्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, इथून बाहेर पडल्यानंतर चांगला माणूस बनवून दाखवणार. स्वतःमध्ये आपण बदल घडवू, असा शब्द आर्यन खानने एनसीबी अधिकाऱ्यांना दिला, अशी सूत्रांची माहिती आहे.
एनसीबीच्या अटकेत आलेल्या प्रत्येक आरोपीचे एनसीबीच्या अधिकाऱ्याकडून आणि सामाजिक संस्थाकडून समुपदेशन केलं जातं. ज्यात आर्यन खान याचंही समुपदेशन करण्यात आलं. वानखेडे यांनी स्वतःदेखील आर्यन खानशी संवाद साधला आणि त्याचे समुपदेशन केले. आर्यन खाननेही त्यांच्या या समुपदेशनाला चांगला प्रतिसाद देत मी इथून बाहेर पडल्यानंतर चांगला व्यक्ती बनवून दाखवेन, चांगली कामे करेन असा शब्द दिला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान म्हणाला की, इथून बाहेर पडल्यानंतर मी गरिबांसाठी आर्थिक आणि सामाजिक पातळीवर काम करण्याचा प्रयत्न करेन. चुकीच्या गोष्टीत पुन्हा नाव येईल असं होणार नाही.
काही महिन्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना गर्व वाटेल, असं काम करून दाखविन असा शब्दही आर्यन खानने समुपदेशनानंतर दिला.
हे ही वाचा:
जागतिक बँक भारताच्या लसीकरणाबद्दल हे म्हणाली….
टी-२० क्रिकेटचा विश्वविजेता होण्यासाठी आजपासून घमासान
उल्हासनगरमध्ये पोलिसावरच चाकूने जीवघेणा हल्ला
एनसीबी कस्टडीत असताना आर्यन खान आणि इतर आरोपीच सामाजिक संस्था आणि एनसीबी अधिकाऱ्याकडून समुदेशन करण्यात आलं होतं. ड्रग्स प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच एनसीबीच्या वतीने समुपदेशन करण्यात येतं. त्यांच्यात सुधारणा व्हावी, त्यांनी ड्रग्सपासून दूर राहावं हे त्यांना समजावण्यात येतं.