27 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरक्राईमनामापूजा ददलानीला तिसरे समन्स; त्यानंतर काय?

पूजा ददलानीला तिसरे समन्स; त्यानंतर काय?

Google News Follow

Related

अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिला मुंबई ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी तिसरे समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही पूजा ददलानी हिला समन्स बजावण्यात आले होते. मात्र, ती तब्येतीचे कारण देत एनसीबी कार्यालयात गैरहजर राहिली होती. तिने आणखी काही वेळ मागितला होता. आता तिसऱ्या समन्सलाही ती हजर राहिली नाही तर तिला अटक करण्यात येईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेकांना मुंबई ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत होते आणि या प्रकरणाला राजकीय रंगही चढला होता. या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही वसुलीचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या खंडणीच्या आरोपाचा तपास करण्यासाठी एसआयटी टीम तयार करण्यात आली. त्याप्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचेही नाव समोर आले होते त्यानुसार तिचीही या प्रकरणात चौकशी होणार आहे.

हे ही वाचा:

शिवशाहिरांनी ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श सतत प्रेरणा देतील

रझा अकादमी, अर्जुन खोतकर नितेश राणेंच्या निशाण्यावर

वय इथले संपत नाही; १०४ वर्षांच्या आजीने मिळविले ८९ गुण

राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विमानात प्रवाशावर केले उपचार

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतरांना ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर एनसीबी आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले. या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा