शाहनवाज हा ‘ऑनलाइन गेमिंग एप्लीकेशनच्या’ माध्यमातून तरुणांचे ‘धर्मांतर करण्याचे रॅकेट’ चालवायचा.पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याची सखोल चौकशी करण्यात आली असता शेवटी पाकिस्तानशी असलेल्या कनेक्शनची कबुली पोलिसांना दिली. चौकशीच्या दुसऱ्या दिवशी त्याने कबूल केले की, तो इंस्टाग्रामच्या माध्यमातून पाकिस्तानी लोकांशी संवाद साधत असे आणि अल्पवयीन मुलांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करत असे. पोलिसांनी शहानवाज उर्फ बद्दोच्या कबुलीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे. पोलिसांनी शुक्रवारी सकाळी बद्दोला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत ताब्यात घेतले होते. चौकशीच्या पहिल्या दिवशी त्याने पाकिस्तानी संबंध आणि धर्मांतराचे आरोप फेटाळून लावले होते.
शनिवारी काही तासांच्या चौकशी दरम्यान पोलिसांनी त्याच्या ‘इंस्टाग्राम आयडीवरून’ जप्त केलेल्या हजारो ‘चॅट पैकी सुमारे १५० च्या प्रिंट्स’ त्याच्यासमोर ठेवल्या तेव्हा त्याला धक्का बसला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो काही काळ मौन पाळल्यानंतर त्याने पाकिस्तानशी संबंध असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आका आणि त्याच्या पाकिस्तानात बसलेल्या साथीदारंबाबत चौकशी केली असता त्याने त्यांची ओळख उघड केली नाही. तो म्हणायचा की ज्या लोकांशी तो गप्पा मारायचे ते सर्व ऑनलाईन गेमिंगद्वारे संपर्कात आले होते. त्याला इतरांबद्दल फारशी माहिती नसल्याचे पोलीस चौकशीत नमूद केले.
पोलिसांना बद्दोच्या अशा काही चॅट्स सापडल्या आहेत, ज्या त्याच्या देशद्रोही असण्याकडे निर्देश करतात. एका चॅटिंगमध्ये त्याने स्वतः ‘भारताचा आणि एका विशिष्ट धर्माचा द्वेष’ करण्याविषयी लिहिले होते. पोलिसांच्या तपासात अधिक माहिती उघडकीस आली की, बद्दोचे पाकिस्तानमधील चार लोकांशी संबंध होते. या गटात धर्मांतराची चर्चा व्हायची. चॅटिंगमध्ये २०१९ मध्ये त्यांनी चार लोकांचे धर्मांतर केल्याचे स्वीकारले आहे. त्याचप्रमाणे एका पाकिस्तानी व्यक्तीने धर्मांतर केल्याची चर्चा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बद्दो व पाकिस्तानातील त्याच्या साथीदारांना पाकिस्तानी अल्पसंख्याकांचे धर्मांतर करण्यासाठी भडकावत असे.
हे ही वाचा:
‘पंतप्रधान मोदी’ आणि ‘इजिप्तचे पंतप्रधान मोस्तफा मादबौली’ यांची भेट!
वॅग्नरच्या बंडानंतर झेलेन्स्की काय म्हणाले?
पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येतात हाच त्यांच्या कर्तृत्वाचा विजय
सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केले १० कोटींचे हेरॉईन
पोलीस आयुक्त अजय कुमार मिश्रा यांनी माहिती दिली की, चौकशीत शाहनवाज उर्फ बद्दो त्याचे पाकिस्तानी कनेक्शन आणि धर्मांतर करण्याचा आरोप स्वीकारला आहे. पाकिस्तानी सहकाऱ्यांसोबत गट तयार करून तो धर्मांतरांची चर्चा करायचा. बद्दोची चौकशी अजूनही सुरू आहे. त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असल्याचे, मिश्रा यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बद्दो हा कट्टर धर्मोपदेशक आणि भारतातील वॉन्टेड डॉ. झाकीर नाईकचा कट्टर समर्थक आहे.
बद्दो हा झाकीर नाईकचे व्हिडिओ पाहत असे.बद्दोची तपासात चार नावे आतापर्यंत समोर आले आहेत. शाहनवाज मकसूद खान, शानू, बेड-ओ, आणि रिदान अशी ही चार नावे आहेत.बद्दोने रिदान नावाचा इंस्टाग्राम आयडी तयार केला आहे.बद्दो हा अनमोल नावाच्या दुसऱ्या मुलाला धर्मांतरासाठी प्रवृत्त करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
बद्दो विरुद्ध पुरावे
१) बद्दोपासून जप्त केलेल्या मोबाईल मध्ये ११ ईमेल आयडी सापडले आहेत.त्यातील सहा पाकिस्तानमधील एक कतार आणि एक फ्रान्समधील आहे.
२) गुलाम नामक काश्मीरच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे मार्कशीट आणि लाहोरच्या ट्राफिक कॉन्स्टेबलचे आयकार्डही मोबाईल वरून सापडले.
३) वर्ष २०१३ मध्ये पाकिस्तान मधून तयार केलेल्या ईमेल आयडीवर १८ संदेशांची देवाण-घेवाण झाल्याचे आढळले.
४) पाकिस्तानी कॉम्रेडचा एक गट तयार करून त्यात धर्मांतराची चर्चा रंगल्या.
५) अल्पवयीन मुलांचे धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचे चॅट्स आढळले.
६) चॅटिंग मध्ये पाकिस्तान समर्थक असल्याच्या आढळले.