पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणातील आरोपी शाहजहान शेख याला बुधवार, २४ एप्रिल रोजी पश्चिम बंगालमधील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या गाडीत बसलेल्या शाहजहान याला रडू कोसळल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्त संस्थेने दिले आहे. कुटुंबीयांशी बोलताना शाहजहान शेख रडू लागला.
बुधवारी ईडीच्या कोठडीची मुदत संपल्याने शेखला आज बसीरहाट उपविभागीय न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्याच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. शाहजहान शेखवर महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि जमीन हडप केल्याचा आरोप आहे. यापूर्वी शाहजहान शेख अटकेच्या वेळी उद्धटपणे फिरत असल्याचा व्हिडिओही समोर आला होता. त्यामुळे आता अटकेत असलेल्या शाहजहानला रडू कोसळत असल्याचे बोलले जात आहे.
शाहजहान शेखचा हा व्हिडिओ पोलिस व्हॅनचा आहे. शाहजहान पोलिस व्हॅनमध्ये बसला आहे. कुटुंबातील सदस्य आणि त्याचे कार्यकर्ते व्हॅनच्या बाहेर उभे आहेत. यावेळी शाहजहान शेखचे कुटुंबीय बाहेर रडायला लागले. कुटुंबीयांना रडताना पाहून शाहजहान शेखलाही अश्रू अनावर झाले. यासोबतच तो घरातील सदस्यांनाही गप्प राहण्याचे संकेत देतो. यावेळी शाहजहानच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. शाहजहान शेखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#WATCH | Sandeshkhali case | North 24 Parganas, West Bengal: Suspended TMC leader and accused Sheikh Shahjahan was produced before Basirhat Subdivision Court today at the end of his ED custody. The court extended his custody by 14 days.
He broke down in the prison van while… pic.twitter.com/JnHhCTy3xQ
— ANI (@ANI) April 24, 2024
यापूर्वी, ईडीने तृणमूल काँग्रेसचे निलंबित नेते शाहजहान शेख यांच्या तीन साथीदारांना मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून अटक केली होती. शिवप्रसाद हाजरा, शेख आलमगीर आणि दीदार बक्श मुल्ला यांना फेडरल एजन्सीने १२ एप्रिल रोजी ताब्यात घेतले होते. ईडी अधिकाऱ्यांवर जमावाने हल्ला केल्याप्रकरणी शेखला ३० मार्च रोजी अटक करण्यात आली होती. ५ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथील संदेशखळी येथे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शेखच्या घराची झडती घेण्यासाठी अधिकारी गेले असता ही घटना घडली. फेडरल एजन्सीने मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप केला आहे की शेख यांनी मासेमारी व्यवसायाच्या नावाखाली पैशाची लाँडरिंग केली गेली.
हे ही वाचा:
पतंजलीकडून पूर्वीच्या माफीनाम्यापेक्षा अधिक ठळक, आकाराने मोठा माफीनामा जारी
मुंबईत सूर्य आग ओकणार; आठवड्याअंती उकाडा वाढणार
क्रूर पाकिस्तानी दहशतवादी अबू हमजाविरोधात लूकआऊट नोटीस
शाहजहान याची सीबीआयकडे रवानगी केल्यानंतरही अवघ्या चार दिवसात शेख याचे हावभाव बदलले होते. शाहजहान शेखला न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसत होता. शेख याचा पूर्वीचा अहंकार पूर्णपणे नाहीसा झालेला दिसत होता. त्यामुळे त्याचे अश्रू पाहूनही त्याचा अहंकार गळून गेल्याची चर्चा आहे.