नुकतीच मुंबईतील जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली. काम मिळवण्याच्या आशेने या अभिनेत्री एका दलाल महिलेच्या कचाट्यात फसल्या होत्या.
मुंबई या स्वप्न नगरीकडे अनेकजण आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने येत असतात. खासकरून चित्रपटसृष्टी आणि त्या अनुषंगाने मिळणारी कामे याकरता मुंबईत येणारे अनेकजण स्वप्न घेऊन येतात. नुकतेच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका महिलेला अटक करण्यात आलेली आहे. नवीन मुलींना जाहिरातीमध्ये काम देण्याचे स्वप्न दाखवण्यात या महिलेचा हातखंडा आहे. तसेच हे कामाचे स्वप्न दाखवून त्यांना देहविक्री करण्याचा धंद्यात लोटण्याचा या महिलेवर आरोप आहे.
जुहूमधील पंचतारांकित हॉटेलमधून गुन्हे शाखेने नुकतीच दोन अभिनेत्रींची सुटका केलेली आहे. दलाल असलेली ही महिला स्वतः याच क्षेत्रात काम करत असल्याचे आता पोलिसांकडून माहिती मिळत आहे.
हे ही वाचा:
ठाणे: शिवसेना महापौरच म्हणतात ‘नारायण राणे अंगार है!’
शहरी नक्षलवाद्यांना देशाविरुद्ध युद्ध पुकारायचे होते!
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेमुळे महाराष्ट्रात खळबळ
सॅटिस पुलाखालची अग्निरोधक यंत्रणा वायूवेगाने पळवली
अभिनय क्षेत्रातील परिचयाची असलेली एक मॉडेल जास्त पैसे तसेच भूमिका देऊ या अटीवर अनेकींना आपल्या जाळ्यात ओढते, अशी माहिती युनिट ७ च्या पथकाला मिळाली. प्रभारी पोलिस निरीक्षक मनिष श्रीधनकर, सुधीर जाधव यांच्या पथकाने अखेर या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावला. या टीमने सापळा रचून बनावट ग्राहक तयार केला. या ग्राहकाने संबंधित दलाल महिलेशी संपर्क साधला आणि त्यानंतर हे सर्व रॅकेट पोलिसांना उघड करण्यात यश आले. संबंधित दलाल महिलेने दोन अभिनेत्रींना चार लाखांचा मोबदला मागितला होता. त्यामुळेच या दलालने अशी अनेक कामे यापूर्वी केली असतील अशीच आता पोलिसांना शंका आहे.
प्रभारी पोलिस निरीक्षक मनिष श्रीधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुधीर जाधव यांच्या पथकाने सापळा रचून दोन अभिनेत्रींची सुटका केली. तसेच त्यानंतर दलाल महिलेला ताब्यात घेतले आहे.