अमेरिकेत पुन्हा एकदा सामूहिक गोळीबाराची घटना घडली आहे. व्हर्जिनियातील वॉलमार्ट स्टोअरमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्हर्जिनिया वॉलमार्टमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबारात अनेक जण ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत.
गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेचे गांभीर्य आणि परिस्थिती लक्षात घेता हा आकडा अजून वाढू शकतो, असा दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. लोकांना परिसरापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.हा गोळीबार स्टोअरच्या व्यवस्थापकाने केल्याचा दावाही अनेक वृत्तांत केला जात आहे. त्याने आधी कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला आणि नंतर स्वत:वर गोळी झाडली. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
हे ही वाचा :
व्हासटऍप व्हिडीओ कॉल आला आणि तरुण अडकला जाळ्यात
बारसू रिफायनरीतून विविध टप्प्यांवर ५ लाख रोजगार निर्मिती
आसाम-मेघालय सीमेवर हिंसाचार, गोळीबारात ६ जणांचा मृत्यू
नशीब बलवत्तर… न्यूझीलंडचे ‘टाय टाय’ फीश
याआधी फिलाडेल्फियाच्या केन्सिंग्टन आणि ऍलेघेनी भागातील एका बारमध्ये काही हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. यादरम्यान १२ जण गंभीर जखमी झाले. गेल्या महिन्यात १३ ऑक्टोबरला दक्षिण अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्यातून अशीच बातमी समोर आली होती. येथील एका रहिवासी भागात गोळीबार झाला, ज्यामध्ये कर्तव्यावर नसलेल्या पोलिसासह पाच जण ठार झाले. याआधी फ्लोरिडाच्या टँपा शहरात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता, तर सहा जण जखमी झाले होते.