मणिपूर विवस्त्र धिंड प्रकरणातील सातव्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

इतर आरोपींचा शोध सुरू

मणिपूर विवस्त्र धिंड प्रकरणातील सातव्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मे महिन्यात घडला होता. याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. त्यानंतर सर्वच स्तरांवरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर मणिपूरमधील पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणातल्या सातव्या आरोपीला अटक केली आहे. अद्याप इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ४ मे २०२३ ला घडला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच त्याचे देशभरात पडसाद उमटले. आत्तापर्यंत अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी एकजण अल्पवयीन आहे अशीही माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीच्या आधारे पोलीस इतर आरोपींना अटक करत आहेत.

बुधवार, १९ जुलै च्या रात्री सोशल मीडियावर मणिपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये पुरुषांचा एक मोठा गट दोन महिलांची रस्त्यावरून निर्वस्त्र धिंड काढत असल्याचे दिसत होते. त्यानंतर या महिलांना एका शेताच्या दिशेने नेण्यात आले. त्या ठिकाणी या महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला. ही घटना थौबल जिल्ह्यात घडली.

हे ही वाचा:

महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये राजस्थानचा क्रमांक पहिला

मणिपूरमध्ये म्यानमारच्या ७१८ जणांची घुसखोरी?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच, दुसरे कुणीही नाही!

दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनाने सुरू होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा

विशेष म्हणजे कारवाई दरम्यान एका आरोपीकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. या फोनचा वापर घटनेचा व्हिडीओ बनवण्यासाठी करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. हा फोन पुढील तपासासाठी सायबर सेलकडे पाठवण्यात आला आहे.

Exit mobile version