27 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरक्राईमनामापाकिस्तानचा जल्लोष करणाऱ्यांना उत्तर प्रदेशात बेड्या

पाकिस्तानचा जल्लोष करणाऱ्यांना उत्तर प्रदेशात बेड्या

Google News Follow

Related

टी २० विश्वचषक २०२१ च्या पहिल्याच सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तान संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. भारताने हा सामना गमावताच भारतात काही ठिकाणी पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष सुरू झाला. एवढेच नाही तर फटाकेही फोडण्यात आले. मात्र उत्तर प्रदेशातील योगी सरकारने देशाच्या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्यातील अशा लोकांची ओळख पटली आहे. तसेच मुख्यमंत्री योगी यांनी अशा लोकांवर देशद्रोहाचा खटला चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर यूपी पोलिसांनी पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांवर कारवाई केली आहे. त्यापैकी ३ आग्रा, ३ बरेली आणि लखनौमध्ये एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आलेले आहे.

दुसरीकडे राजस्थानच्या उदयपूरमध्ये पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या महिला शिक्षिका नफीसाला अटारी येथून अटक करण्यात आली आहे. या शिक्षिकेने आपल्या मोबाईलवरील स्टेटसवर पाकिस्तानच्या विजयाच्या फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले की, आता आम्ही जिंकलो आहोत. त्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने त्यांना शिक्षक पदावरून बडतर्फ केल्याने आनंद व्यक्त करण्यात आला होता.

 

हे ही वाचा:

अखेर आर्यन खानला जामीन मंजूर

आर्यन खान मन्नतवर साजरा करणार शाहरुखचा वाढदिवस

पालिकेत ‘भंगार’ रॅकेट; लिलाव करणाऱ्याचा आणि लाभार्थ्याचा पत्ता एकच!

नवाब, जवाब आणि हमाम!

 

या प्रकरणी हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी फटाके फोडणे आणि उत्सव साजरा करण्याच्या घटना अत्यंत लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. यासोबतच अनिल विज यांनी हे कृत्य करणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. पाकिस्तान क्रिकेट सामना जिंकल्यावर भारतात फटाके फोडणाऱ्यांचा डीएनए भारतीय असू शकत नाही. तुमच्या घरात लपलेल्या गद्दारांपासून सावध राहा असे म्हटले आहे. २४ ऑक्टोबर रोजी टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये सामना झाला होता, ज्यामध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काही लोकांनी पाकिस्तानचा विजय साजरा केला, ज्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा