केंद्र सरकारने नक्षलवादी कारवायांविरोधात मोहीम उघडली असून नक्षलवाद संपवण्याचा मानस सरकारने ठेवला आहे. याचं पार्श्वभूमीवर सध्या सुरक्षा दलांकडून नक्षल विरोधी कारवायांना वेग आला आहे. अशातच तेलंगणामध्ये सुरक्षा दलाच्या पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुलुगु जिल्ह्यातील एतुरागरामच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
मुलुगु जिल्ह्यातील एतुरागरामच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत सात नक्षल्यांचा खात्मा केला आहे. याची माहिती मुलुगुचे एसपी डॉ. सबरीश यांनी दिली आहे. या चकमकीत येलांडू- नरसंपेट क्षेत्र समितीचा कमांडर बद्रू उर्फ पपण्णा ठार झाल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या चकमकीबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
हे ही वाचा..
पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी राज कुंद्राला ईडीचे समन्स
“बीएसएफचे जवान भारताचा सन्मान, महत्त्वाकांक्षा जपण्यासाठी भक्कम ढाल म्हणून उभे”
भारतीय वंशाचे काश पटेल हे एफबीआयच्या संचालक पदी
कॅनडाचे खलिस्तानी प्रेम; दहशतवादी अर्श डल्लाला मिळाला जामीन
या वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. २०२६ पर्यंत नक्षलवादी नष्ट करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. त्या संदर्भात छत्तीसगड पोलिसांकडून सातत्याने मोहीम राबवली जात आहे. तेव्हापासून आतापर्यंत ९६ चकमकी झाल्या आहेत. त्यापैकी ८.८४ कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या २०७ नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे.