25 C
Mumbai
Tuesday, November 19, 2024
घरक्राईमनामा'हरवलेल्या' पतीचा खून झाल्याचे अखेर झाले उघड

‘हरवलेल्या’ पतीचा खून झाल्याचे अखेर झाले उघड

Google News Follow

Related

पोलिसांनी शुक्रवारी २१ वर्षीय महिला, तिची बहिण, दोन भाऊ आणि तीन मित्रांना खून केल्याप्रकरणात कुर्ला येथून अटक केली. आरोपींनी २१ वर्षीय महिलेच्या ‘हरवलेल्या’ पतीचा खून करून मृतदेह आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील भागात पुरल्याचे उघड झाले आहे. दीपक सांगळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने महिलेला खोट्या आरोपांमध्ये अडकवण्याची धमकी दिली होती.

दीपक सांगळे याची पत्नी सरस्वती, पत्नीची बहिण मनीषा अचरे, भाऊ आदित्य आणि आनंद, मित्र विशाल दरडे, किशोर साहू आणि कार्तिक विश्वकर्मा यांना पोलिसांनी खुनाच्या आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. जून महिन्यामध्ये दीपकची बहिण संगीता हिने कुर्ल्यातील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात दीपक हरवल्याची तक्रार नोंदवली होती. तपासादरम्यान दीपक आणि त्याच्या पत्नीचे आणि सासरच्यांचे संबंध चांगले नसल्याचे पोलिसांना समजले आणि पोलिसांनी दीपकच्या जवळील व्यक्तींची चौकशी सुरू केली.

हे ही वाचा:

पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक; पण सर्वोत्तम फक्त तीन

म्हाडाचे रूप पालटण्यासाठी खर्च होणार बाराशे कोटी

मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न

अमेरिकेच्या माघारीबद्दल त्या शहीद सैनिकाच्या वडिलांना दुःख

प्राथमिक चौकशीतून काहीही समोर आले नाही. मात्र दीपकच्या पत्नीची अधिक चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. दीपक तिला मारहाण आणि तिची छळवणूक करत होता, असे तिने सांगितले. खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देताच तिने इतरांच्या मदतीने त्याचा खून करण्याचा निर्णय घेतला. साहू आणि दरडे या दोघांनाही त्याने असेच एका खोट्या प्रकरणात अडकवल्यामुळे त्यांनी तिची साथ दिली, असे सरस्वतीने चौकशी दरम्यान सांगितले.

दीपकच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्यामुळे दीपक पेंगू लागल्यावर त्यांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करून दीपकचा खून केला. घरापासून ५० ते ६० मीटर अंतरावर असलेल्या क्रांती नगर इथे त्यांनी दीपकचा मृतदेह पुरला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकाणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, सहाय्यक निरीक्षक अमोल माळी, जयदीप जाधव, येरकर आणि इतर अधिकाऱ्यांनी केला. अटक केलेल्या सातही आरोपींना ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा