लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद झाल्याने बनावट नोटांचा छापखाना सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. नाशिक पोलिसांनी याविरुद्ध कारवाई करून सात जणांना अटक केली आहे. नाशिकमधील सुरगाणा तालुक्यात हा प्रकार घडला असून आरोपींनी छापखान्यातून आतापर्यंत लाखो बनावट नोटा छापल्या आहेत. आठ दिवसांपूर्वीच बनावट नोटा चलनात आणताना दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडल्यानंतर आता या रॅकेटचा पर्दाफार्श करण्यात सुरगाणा पोलिसांना यश आले आहे.
लॉकडाऊनमुळे कलर प्रिटींगचा व्यवसाय ठप्प झाला होता. हाताला काम नसल्यामुळे या तरुणांनी नोटांचा छापखाना सुरू केला. या छापखान्यात आरोपी वेगवेगळ्या नोटा छापत होते. मागील तीन महिन्यांपासून त्यांचे हे नोटा छापण्याचे काम सुरू होते. नोटा छापण्याचे आणि त्या बाजारात चलनात आणण्याचे काम अगदी नियोजनबद्ध पद्धतीने केले जात होते. काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील बाजारात बनावट नोटा देऊन सामान खरेदी करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या हवाली केले होते. येवला येथील बांधकाम व्यावसायिक हरीष गुजर आणि बाळासाहेब सैद या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.
हे ही वाचा:
कोकणातून परतण्यासाठी फक्त पाच गाड्या?
सिंह आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे ‘झेब्रा क्रॉसिंग’
माहेरची साडी रिलीजला ३० वर्षे पूर्ण
पाकिस्ताननेच आम्हाला अफगाणिस्तानमध्ये फसवले
पोलिसांनी पुढील तपास केल्यावर या दोन आरोपींकडून आणखी नावे समोर आली. येवल्यातून अक्षय राजपूतला अटक केली असता मुख्य आरोपीचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात किरण गिरमे, प्रकाश पिंपळे, राहुल बडोदे, आनंदा कुंभार्डे यांना अटक केली.