आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी टोळीला मदत केल्याचा आरोप वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर ठेवून त्यांची तडकाफडकी सशस्त्र विभागात बदली करण्यात आली आहे. धनंजय सोनवणे असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांचे नाव असून सोनवणे हे सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे काही महिन्यांपूर्वी इमिग्रेशन अधिकारी यांनी आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून टोळीविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बनावट पासपोर्ट आणि व्हिसाचा वापर करून या टोळीने किमान ८० व्यक्तींना अमेरिका, कॅनडा, तुर्की, नेदरलँड्स आणि पोलंड सारख्या देशांमध्ये बेकायदेशीरपणे पाठवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी २८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता.
बनावट पासपोर्ट आणि व्हिसाचा वापर करून परदेशात पाठवण्यासाठी ही टोळी प्रति व्यक्ती ३० लाख ते ५० लाख रुपये आकारत असे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३१८ (४) (फसवणूक), ३१९ (२) (व्यक्तिरूपाने फसवणूक), ३३६ (२) (बनावट), ३३७ (सार्वजनिक रेकॉर्ड, न्यायालयीन रेकॉर्ड किंवा ओळखपत्राची खोटी माहिती), ३४० (२) (खोटे कागदपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड खऱ्या म्हणून वापरणे) आणि ६१ (२) (गुन्हेगारी कट) आणि भारतीय पासपोर्ट कायदा, १९६७ च्या कलम १२ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला.
वक्फमध्ये कोणताही गैर-मुस्लिम येणार नाही, विरोधकांनी भीती पसरवली!
सद्सदविवेकबुद्धी ज्यांची जागृत आहे ते विधेयकाला समर्थन करतील, विशेषतः उबाठा वाले!
मातोश्रीवर वक्फ बोर्डाची करडी नजर पडेल तेव्हा बोला!
म्हणून सरकार ४०० पार हवे होते…
गेल्या महिन्यात बँकॉकहून मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर अंधेरी पूर्वेतील रहिवासी रोशन भास्कर दुधवडकर याला इमिग्रेशन विभागाने अटक केल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आले. या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय असल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने दुधवडकरला ताब्यात घेतले आणि त्यानंतर अरुण दुधवडकर, अजित पुरी, इम्तियाजली मोहम्मद हनीफ शेख, सुधीर सावंत आणि संजय चव्हाण या इतर आरोपींना अटक केली.
गुन्हे शाखेच्या तपासात सहार पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सोनवणे यांनी आरोपींपैकी एकाच्या विरुद्ध पूर्वीच्या तस्करीच्या प्रकरणाची चौकशी केली नव्हती, धनंजय सोनावणे यांनी या आरोपीला सहकार्य केले होते अशी माहिती तपासात समोर आल्यानंतर सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सोनवणे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.
“आम्ही सहार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय सोनवणे यांची स्थानिक शस्त्रास्त्र युनिटमध्ये बदली केली आहे,” असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. “वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा निष्काळजीपणा आढळून आला, म्हणून गुन्हे शाखेकडून अहवाल मिळाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली.