आपल्या वरिष्ठांशी पटत नसल्याने किंवा त्यांच्याशी एखाद्या कारणावरून वाद झाल्याने संतापलेल्या कनिष्ठ अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने वरिष्ठाची हत्या केल्याची प्रकरणे अनेकवेळा घडली आहेत. कल्याण येथे अशाच एका घटनेने प्रचंड खळबळ निर्माण झाली.
रेल्वे पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक बसवराज गर्ग (५६) यांच्यावर रेल्वे पोलिस दलाचे कॉन्स्टेबल पंकज यादव (४०) यांनी हल्ला करून त्यांना ठार केल्याची ही घटना घडली. रेल्वे पोलिस दलाच्या मुख्यालयात हा हल्ला झाला. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एम.आर. देशमुख यांनी ही माहिती दिली.
हे ही वाचा:
बहुप्रतीक्षित डबल डेकर वातानुकूलित ई बस सेवा पुढील आठवड्यात सुरु
ट्विटर ब्लूची सशुल्क सेवा भारतात सुरू.. अशी मिळेल सुविधा
उद्धव ठाकरेंसमोर त्यांचेच उपनेते वादाला पेटले
राष्ट्रवादीचे औरंगजेब प्रेम पुन्हा जागृत
आरोपी पंकज यादव आणि बसवराज यांच्यात दोन वर्षांपूर्वी जोरदार भांडण झाले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये वैमनस्य होते. त्यानंतर गर्ग यांनी सातत्याने यादव याची चौकशी सुरू केली आणि त्याचा पगारही कमी केला. गेल्या दोन वर्षांत गर्ग यांनी यादवचा पगार इतका कमी केला की त्यांना केवळ बेसिक पगारच मिळत होता. त्यामुळे यादव हा अत्यंत चिंतेत होता. प्रयत्न करूनही आपल्या पगारात वाढ होत नाही, याचा त्यांना राग येत होता. गर्ग यांच्यामुळेच आपला पगार वाढत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. तो राग असलेल्या यादवचा गर्ग यांच्याशी संघर्ष झाला. त्यात यादवने गर्ग यांच्या डोक्यात काठीने प्रहार केला आणि तो तिथून पळून गेला.
जखमी अवस्थेत गर्ग यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. आता पोलिसांनी यादव याला ताब्यात घेतले आहे. त्याला आता न्यायालयासमोर उभे केले जाईल आणि त्याची कोठडी मागितली जाईल.
पंकज यादव रोहा येथे तैनात होते. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी पेण येथून अटक केली.