22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामाअसदुद्दीन ओवैसी यांच्या व्याह्याने केली आत्महत्या

असदुद्दीन ओवैसी यांच्या व्याह्याने केली आत्महत्या

स्वतःवर गोळी झाडत संपवले जीवन

Google News Follow

Related

एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या व्याह्याने स्वतःवर गोळी झाडत आज हैदराबाद येथे आत्महत्या केल्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. हैदराबादचे प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मजरुद्दीन अली खान असे त्यांचे नाव असून आपल्या राहत्या घरी त्यांनी गोळी झाडून घेतली आहे.

मजरुद्दीन यांनी मालमत्तेच्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत असल्याचे कळले आहे. डॉ. मजरुद्दीन खान हे ६० वर्षीय खासदार ओवेसी यांच्या द्वितीय कन्येचे सासरे होते. त्यांनी त्यांच्या बंजारा हिल्स येथे आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे.

हे ही वाचा:

वकील प्रवीण चव्हाण गजाआड… कालिया, सांबा अडकले, गब्बर सिंगला अटक कधी?

व्हीप जारी झाला,ठाकरे गटाकडून सगळंच निसटतंय ?

संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवा!! NIAने केले मुंबई पोलिसांना सतर्क

भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकावू कसे शकतात?

डॉ. खान यांना त्वरित रुग्णालयांत नेण्यात आले मात्र , उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार डॉ. खान यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल हे मालमत्ता आणि कौटुंबिक वादातून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. खान यांच्याकडे असलेल्या परवानाधारक बंदुकीने स्वतःवर गोळी झाडली आहे. सोमवारी खान हे घरी एकटेच होते त्यांच्या नातेवाईकांनि त्यांच्याशी सतत दूरध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयन्त केला, पण ते फोनच उचलत नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना संशय आला आणि ते खान यांना बघायला घरी आले असता डॉ. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हैदराबाद येथील पश्चिम झोनचे डीसीपी झोएल डेव्हिस यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.   असदुद्दीन ओवैसी हे ऑल इंडिया मजलिस ए ईत्तेहादूल मुस्लिमिन या पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००४ पासून ते हैदराबाद्चे खासदार आहेत. असुदुद्दीन ओवैसी  यांचा नुकताच मुंबई दौरा सुद्धा झाला होता. ए आय एम आय एम या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला ते उपस्थित होते. आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा