27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामाज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करण्यापूर्वी केला पत्नीवर प्राणघातक हल्ला

ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करण्यापूर्वी केला पत्नीवर प्राणघातक हल्ला

पोलिसांनी दाखल केला गुन्हा पत्नी गंभीर जखमी

Google News Follow

Related

मानसिक आजारातून ६४ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने पत्नीवर धारधार शस्त्राने हल्ला केल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मुलुंड पूर्व येथील म्हाडा वसाहत येथे घडली. या घटनेत पत्नी गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नवघर पोलिसांनी या घटनेत मृत झालेल्या ज्येष्ठ नागरिकावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवन यादव (६४) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या नागरिकाचे नाव असून त्याची पत्नी पलानी कोणार्क (५४) ही गंभीररीत्या जखमी झाली आहे.

शिवन यादव यांना एक मुलगा आणि एक मुलगी ही अपत्ये आहेत. मुलाचे लग्न झाले असून मुलगी धान्या ही त्यांच्यासोबत मुलुंड पूर्व नवघर म्हाडा वसाहतीतील २२ मजली इमारतीत राहण्यास होते. गुरुवारी रात्री धान्या ही घरी आली असता घराचा दरवाजा बंद असल्यामुळे तिने बेल वाजवून ही दरवाजा उघडत नसल्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने तिने दार उघडले.  घरातील दृश्य बघून तिला धक्काच बसला. आई रक्ताच्या थारोळ्यात तर वडील गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले.

हे ही वाचा:

कुनोतून पाळलेला ओबन चित्ता घरी परतला , आशाची मात्र अजूनही निराशा

१५५ देशांतील नद्यांच्या पाण्याने करणार रामललाचा जलाभिषेक

७१ हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकऱ्या

नरेंद्र मोदींवर विश्वास व्यक्त करत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार भाजपात

या घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी शिवन यांना मृत घोषित केले व जखमी पलानीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवन याला मानसिक आजार होता, या मानसिक आजारातून त्याने हे कृत्य केले असावे अशी शक्यता वर्तवली आहे.याप्रकरणी नवघर पोलिसानी शिलवन यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा