27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामाविनयभंग प्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटेला अटक !

विनयभंग प्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटेला अटक !

मठात बोलवून महिलेवर अत्याचार

Google News Follow

Related

परळीतील धाराशिव येथे महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या महिलेस खोलीमध्ये बोलावून घेत विनयभंग केला.तसेच महिलेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी कळंब तालुक्यातील मलकापूर येथील आपल्या दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांना पोलिसांनी सापळा रचून पंढरपुरातून अटक करण्यात आली आहे.

मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर मलकापूर संस्थांनचे सर्वेसर्वा राष्ट्रसंत तसेच भाविकांच्या सर्व समस्येवर उपाय करणारे स्वयंघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराज यांच्या दर्शनासाठी परळी येथील ३५ वर्षीय महिला मठातील दक्षिण मंडपात गेली होती. त्या महिलेस खोलीमध्ये बोलावून घेत विनयभंग करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.यानंतर एकनाथ लोमटे महाराजाविरोधात २८ जुलै २०२२ रोजी पीडित भक्त महिलेनं तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लोमटे महाराजांविरोधात येरमाळा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा:

केंद्र सरकारने ठरवले टॉमेटो विकायचे ५० रुपये किलो दराने!

अजित पवारांसमोरच कार्यकर्त्यांकडून गोंधळ !

हरियाणातील नूह हिंसाचारप्रकरणी गोरक्षक बिट्टू बजरंगीला अटक !

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे कार्य करू!

महिलेने तक्रारीत नमूद केले आहे की,महाराजांनी प्रवचन खोलीमध्ये बोलावले आणि विनयभंग केला. या घटनेने मंदिर परिसरामध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता, यावेळी महाराजांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्याच रात्री एक वाजता सुमारात महिलेच्या तक्रारीवरून महाराजांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अटक ही झाली होती. मात्र, त्यांची जामीनवर सुटका झाली. पीडित भाविक महिला अत्याचार प्रकरणी न्यायालयामध्ये दाद मागितली होती. पीडित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने एकनाथ महाराजवर गुन्हा दाखल करून अटक करण्याचे पोलिसांना आदेश दिले.त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रुचून लोमटे महाराजाला पंढरपूरमधून अटक केली आहे.महाराजांनी किती महिला भक्तांची फसवणूक केली हे तपासात उघड होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. यापूर्वीही महाराजांवर जादूटोणा आणि लोकांना फसवल्याचे गुन्हे दाखल आहेत.

विविध पक्षांचे बडे नेतेही महाराजांपुढे नतमस्तक
दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे लोमटे महाराज यांचा कळंब तालुक्यातील मलकापूर येथे मठ आहे.आपल्याकडे दैवी शक्ती आहे आणि आपण त्या शक्तीने आजारी व्यक्तीला, भक्ताला बरे करू शकतो अशी महाजांनी ख्याती आहे.राज्यभर महाराजांचा मोठा भक्त वर्ग असून यामध्ये विविध पक्षांच्या बड्या नेत्यांचाही समावेश आहे.महिलेच्या विनयभंग प्रकरणी लोमटे महाराज याला अटक झाल्याने धार्मिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा