देशातील नक्षलग्रस्त भागात सध्या नक्षलवादविरोधी मोहीम अधिक आक्रमक करण्यात आली आहे. सातत्याने शोधमोहीम राबवण्यात येत असून कारवाईत मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांचा खात्माही केला जात आहे. नक्षलवाद्यांची ठिकाणे उध्वस्त करून शस्त्रसाठाही जप्त केला जात आहे. दरम्यान, बुधवार, २९ जानेवारी रोजी झारखंडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाल्याची माहिती आहे.
झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात झारखंड पोलीस, 209 COBRA बटालियन, सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत एका नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला आहे. तर, आणखी काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. याशिवाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून दोन इन्सास रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. अजूनही ही मोहीम सुरू असून शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
Jharkhand | Encounter between security forces- Jharkhand police and CoBR 209 battalion, and naxals in Chaibasa. One body of a naxal has been recovered so far. A few more are injured. 2 INSAS rifles were also recovered. Operation and search are underway. More details awaited:…
— ANI (@ANI) January 29, 2025
हे ही वाचा:
मौनी अमावस्येपूर्वी संगम परिसरात चेंगराचेंगरी; १० भाविकांचा मृत्यू
‘छावा’ चित्रपटातील ‘ते’ दृश्य हटणार, पण भाजपाच्या जिल्हाध्यक्षांची आणखी एक मागणी!
राणा अय्युब विरुद्ध एफआयआर दाखल
दरम्यान, केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद संपवण्याची शपथ घेतली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये अजेंडा आजतक येथे आपल्या भाषणात गृहमंत्री अमित शाह म्हणाले, छत्तीसगडमधील फक्त दोन जिल्हे नक्षल प्रभावाखाली आहेत. आणि ते ३१ मार्च २०२३ पर्यंत मुक्त केले जातील. तर, प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव म्हणाले की, नक्षलवाद आता शेवटचा श्वास घेत असून लवकरच बस्तर पूर्णपणे नक्षलमुक्त होईल. आमच्या सैनिकांनी नक्षलवाद्यांच्या सर्वात सुरक्षित ठिकाणांवर हल्ला केला. ऑपरेशनचे परिणाम खूप चांगले झाले आहेत आणि वर्षभरात २६० हून अधिक नक्षलवादी मारले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.