जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातून सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे. सुरक्षा दलांनी तंगधारमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडतांनाच एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. बांदीपोरा येथेही सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दोन्ही ठिकाणांहून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.
शुक्रवारी लष्कराने नियंत्रण रेषेजवळ मारण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून तीन एके-४७ रायफल, तीन पिस्तूल, तीन मॅगझिन, २ चिनी हँडग्रेनेड आणि २०० पेक्षा जास्त एके-४७ रायफलची काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून खाद्यपदार्थ आणि काही औषधे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे दशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न हणून पडला आहे.
अन्य एका कारवाईत जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सुरक्षा दलांसह संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत बांदीपोरा जिल्ह्यातील सुमलार भागात नाका तपासणीदरम्यान दोन लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांकडून जिवंत हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. या दहशतवाद्यांविरोधात यूएपीएच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातही लष्कर-ए-तैयबाशी संबंधित एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून काही स्फोटक साहित्यही जप्त करण्यात आले आहे. बारामुल्ला येथील सिंगपोरा पट्टण येथील चेकपॉईंटवर तपासणी करण्यात येत होती. या तपासणी दरम्यान सुरक्षा दलाला मोतीपोरा येथून पारंपारिक पोशाखघातलेला एक व्यक्ती येताना दिसला. नाका पथकाला पाहून त्या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र दक्षता पथकाने पाठलाग करून त्याला पकडले असे पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देतांना सांगितले.
हे ही वाचा:
ओमानमधील भर कार्यक्रमात झाकीर नाईकने हिंदू महिलेला केले धर्मांतरित
मी महाराष्ट्राची मुलगी, आज माहेरी आल्यासारखे वाटते आहे!
ईडीच्या कार्यालयातील संवेदनशील माहिती पुरविणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना अटक
केंद्र सरकारचा सामान्यांना मोठा दिलासा, सिलिंडरसाठी मिळणार २०० रुपये सबसिडी
या दहशतवाद्याच्या तपासणीमध्ये एके-४७ चे ७१ राऊंड जप्त करण्यात आले. या दहशतवाद्याला त्यानंतर त्याला तात्काळ अटक करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आपले नाव अली मोहम्मद भट आहे आणि आपण बोनिचकल अरामपोरा पट्टण येथे राहतो असे त्याने चौकशीच्या वेळी सांगितले. बंदी घालण्यात आलेल्या लष्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटने सोबत काम करत असल्याचे त्याने म्हटलं आहे. अलीविरुद्ध शस्त्रास्त्र कायदा आणि युएपीए कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.याआधी गुरुवारी, सुरक्षा दलांनी सोपोर येथून लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली आणि त्याच्या ताब्यातून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला.