सलमान खान गोळीबार प्रकरणात वापरण्यात आलेल्या २ पिस्तुल आणि ४ मॅगझीन सुरतच्या तापी नदीच्या पात्रातून हस्तगत करण्यात आल्या आहेत. मुंबई क्राईम ब्रँचचे चकमक फेम (एन्काऊंटर स्पेशालिस्ट) दया नायक यांचे पथक सोमवारी सुरत येथे पिस्तुलच्या शोधात दाखल झाले होते.
पाणबुडीच्या मदतीने या पथकाने सोमवारी एक पिस्तुल आणि एक काडतुस तापी नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आले होते. गुन्ह्यात वापरलेले दुसरे पिस्तुल आणि मॅगझीन चा शोधासाठी मंगळवारी शोध मोहीम राबविण्यात आली होती.आज सकाळी या शोध पथकाला आणखी एक पिस्तुल आणि ४ मॅगझीन आणि १३ काडतुसे नदीच्या पात्रात मिळून आले आहे.
हे ही वाचा:
मतदारांचा आशीर्वाद मोदीजींपर्यंत पोहोचवा
राजौरीत मशिदीच्या बाहेर दहशतवाद्यांचा गोळीबार; सैनिकाच्या भावाची गोळी झाडून हत्या!
ऍरिझोना येथील गाडी अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत चौथ्या क्रमांकाचा लष्करी खर्च करणारा देश
सलमान खान निवासस्थानावर झालेल्या गोळीबारात हल्लेखोरांनी वापरलेले दोन्ही पिस्तुल आणि काडतुसे आणि मॅगझीन तापी नदीच्या पात्रात फेकले होते. या दोन्ही पिस्तुल आणि मॅगझीन मिळून आल्यामुळे या गुन्ह्यातील महत्वाचा पुरावा गुन्हे शाखेच्या हाती लागला आहे. हे दोन्ही पिस्तुल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब कडे पाठविण्यात येमार आहे.
सलमान खानच्या बांद्रा येथील घरावर दोन इसमांनी मध्यरात्री गोळीबार केला होता. त्यानंतर खळबळ उडाली होती. लॉरेन्स बिष्णोई या गँगस्टरचा या प्रकरणात हात असल्याचे समोर आले होते. सलमान खानला विशेष सुरक्षाही त्यानंतर पुरविण्यात आली आहे.