उद्योगपती मुकेश अंबानी यांना २४ तासांत दुसरा धमकीचा मेल

दुसऱ्या मेलमध्ये मागितली २०० कोटींची खंडणी

उद्योगपती मुकेश अंबानी यांना २४ तासांत दुसरा धमकीचा मेल

mukesh ambani

रिलायंस ग्रुप चे अध्यक्ष उद्योगपती मुकेश अंबानी यांना दुसरा धमकीचा ईमेल आला असून ईमेल करणाऱ्याने यावेळी खंडणीची रक्कम वाढवून २०० कोटी केली आहे. अंबानी यांना २४ तासात आलेला हा दुसरा धमकीचा ईमेल असून या या धमकीच्या ईमेलने उद्योग जगतात खळबळ उडवून दिली आहे.

 

गावदेवी पोलीस ठाण्याला दुसऱ्या ई मेल बाबत अंबानी यांच्या सुरक्षा अधिकारी यांच्याकडून कळवि ण्यात आले आहे. दुसऱ्या धमकीच्या ईमेल मुळे हे प्रकरण गंभीर झाल्यामुळे गावदेवी पोलीस,गुन्हे शाखा, सायबर गुन्हे शाखा तसेच केंद्रीय सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क झालेल्या असून ईमेल कर्त्याचा शोध घेण्यात येत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार पार्क करून,त्यात धमकीचे पत्र ठेवण्यात आलेल्या घटनेला जवळजवळ तीन वर्षे उलटत आली आहे.

 

या गुन्ह्याची उकल देखील करण्यात आली मात्र या प्रकरणामागचे सत्य अद्यापही समोर आलेले नाही. तोच शुक्रवारी रात्री मुकेश अंबानी यांना आलेल्या एका ईमेल द्वारे जीवे मारण्याची धमकी देऊन २०कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. भारतात आमचे शूटर्स असून खंडणी दिली नाही तर ते गोळ्या झाडतील अशी धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. शादाब खान या व्यक्तीच्या ईमेल वरून ही धमकी देण्यात आली होती.

हे ही वाचा:

अपात्र झाले तरी एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार!

केंद्रीय मंत्रिमंडळाकडूनही ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ नावाला प्राधान्य

गांधीधाम एक्स्प्रेसमधून २६ किलो गांजा जप्त

मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी

या घटनेला २४ तास देखील उलटत नाही तोच शनिवारी सायंकाळी अंबानी यांना धमकीचा दुसरा ईमेल आला, व त्यात खंडणीची रक्कम २० कोटींवरून २०० कोटी करण्यात आली आहे.दुसर्या ईमेलमध्ये धमकी देणाऱ्याने “आपण माझ्या ईमेलला प्रतिसाद दिला नाही. आता रक्कम २०० कोटी आहे अन्यथा मृत्यू वॉरंटवर स्वाक्षरी केलेली आहे”असा मजकूर ईमेलमध्ये लिहण्यात आला आहे.

 

देशातील सर्वात मोठे उद्योगपती यांना आलेल्या धमकीच्या ईमेल मुळे उद्योग जगतात खळबळ उडाली असून तपास यंत्रणेला अलर्ट करण्यात आले आहे. गावदेवी पोलीस, मुंबई गुन्हे शाखा, सायबर गुन्हे शाखा,महाराष्ट्र सायबर सेल आणि केंद्रीय तपास यंत्रणेने या ईमेल ची माहिती काढण्यास सुरुवात केली असून ईमेल कर्त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

Exit mobile version