सेबीचे ईमेल अकाउंट हॅक, हॅकरकडून पाठविण्यात आले अनेकांना मेल

सेबीचे ईमेल अकाउंट हॅक, हॅकरकडून पाठविण्यात आले अनेकांना मेल

देशातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’अर्थात ‘सेबी’ या संस्थेचे अज्ञात हॅकरने ईमेल हॅक करून त्या मेलवरून अनेकांना ईमेल पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात सेबीने तक्रार दाखल केली आहे.

सिक्‍युरिटीज ॲन्ड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या संस्थेचे मुख्यालय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहे. भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी ही सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेत काम करणाऱ्या ११ अधिकाऱ्यांचे  अधिकृत ईमेल अकाउंट अज्ञात हॅकरकडून हॅक करण्यात आले होते, मे महिन्यात हॅक करण्यात आलेले अधिकाऱ्याच्या ईमेल अकाउंट वरून ३४ विविध कंपन्या, तसेच शेअर्स बाजारातील कंपन्यांना ई -मेल पाठवण्यात आले असल्याचे नुकतेच समोर आले आहे. सेबीचे सायबर सिक्युरिटीचे काम बघणारे माहिती तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापकीय अधिकारी यांनी बिकेसी पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली आहे.

हे ही वाचा:

“सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”

भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला

अमेरिकेतील इंडियाना स्टेट मॉलमधल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

ठाकरेंना आणखी एक धक्का; भावना गवळी शिंदेंबरोबरच्या खासदारांच्या प्रतोद?

हॅक करण्यात आलेले ई-मेल अकाउंटस् केवळ सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया कामकाजा साठी वापरले जातात, या अधिकृत ईमेल मध्ये कार्यालयात चालणाऱ्या कामाचा महत्वाचा गोपनिय डाटा असतो, असे तक्रारीत म्हटले आहे. ११ ई-मेल अकाउंटचा बेकायदेशीररित्या ॲक्सेस मिळवून स्वतः सेबीचे अधिकारी असल्याचे भासवून हॅकरने सेबीच्या ई-मेल अकाउंटवरून संबंधित कंपन्यांच्या ई-मेल वर ३४ मेल पाठविण्यात आले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी बिकेसी पोलिसांनी अज्ञात हॅकर विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Exit mobile version