सेबीने गुरुवारी फरारी व्यापारी मेहुल चोक्सीला नोटीस पाठवून १५ दिवसांच्या आत गीतांजली जेम्स लिमिटेडच्या शेअर्सच्या फसवणुकीशी संबंधित प्रकरणात ५.४ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. अन्यथा अटक करण्याचा आणि मालमत्ता तसेच बँक खाती जप्त करण्याचा इशारा दिला आहे.सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) लावलेला दंड चोक्सी याने न भरल्याने ही नोटीस त्याला धाडण्यात आली आहे.
चोक्सी हा गीतांजली जेम्सच्या प्रवर्तक समूहाचा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होता. तसेच, तो नीरव मोदी याचा मामा आहे. या दोघांवर सरकारी मालकीच्या पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी)१४ हजार कोटी रुपयांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सन २०१८च्या सुरुवातीला पीएनबी घोटाळा उघडकीस आल्यानंतर चोक्सी आणि मोदी दोघेही भारतातून पळून गेले.
हे ही वाचा:
ठाकरे, पवारांना निमंत्रण, केजरीवाल, केसीआरवर फुली
रफाएल नदाल पुढील वर्षी करणार टेनिसला अलविदा
उद्धव ठाकरेंचे व्यक्तिगत चांगले संबंध किती जणांशी? बुरे दिन यालाच म्हणतात..
हिंदू तरुणाची द भोपाळ स्टोरी; झाला सौरभचा सलीम
चोक्सी अँटिग्वा आणि बारबुडा येथे असल्याचे सांगितले जात असताना, मोदी ब्रिटनच्या तुरुंगात आहे. त्याने भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीला आव्हान दिले आहे. ऑक्टोबर २०२२मध्ये सेबीने दिलेल्या आदेशात गीतांजली जेम्सच्या शेअर्समध्ये फसवणूक केल्याबद्दल त्याला ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, दंड आकारण्याव्यतिरिक्त, नियामकाने त्याला सिक्युरिटीज मार्केटमधून १० वर्षांसाठी प्रतिबंधित केले होते. गीतांजली जेम्सच्या स्क्रिपमध्ये कथित फेरफार व्यवहाराच्या चौकशीच्या अनुषंगाने सेबीने मे २०२२मध्ये चोक्सीला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती.