शास्त्रज्ञाने घडवला रोहिणी न्यायालयात स्फोट  

शास्त्रज्ञाने घडवला रोहिणी न्यायालयात स्फोट  

दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात ९ डिसेंबरला स्फोट झाला होता. हा स्फोट कमी तीव्रतेचा होता तरीही यात एक जण जखमी झाला होता. या प्रकरणाच्या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) एका शास्त्रज्ञाने हा स्फोट घडवून आणला होता. याप्रकरणी आरोपी भारतभूषण कटारिया याला अटक करण्यात आली आहे.

रोहिणी जिल्हा न्यायालयातील कोर्ट रूम नंबर १०२ मध्ये सकाळच्या सुमारास एक स्फोट झाला होता. या स्फोटात एक व्यक्ती जखमी झाला होता. टिफिनमध्ये आयईडी ठेऊन हा स्फोट घडवण्यात आला होता. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश आस्थाना यांनी सांगितले की, आरोपी हा सकाळी ९.३३ वाजता दोन पिशव्या घेऊन न्यायालयात आला त्यानंतर त्याने कोर्ट रूम नंबर १०२ मध्ये एक बॅग ठेवली. त्यानंतर १०.३५ वाजता हा आरोपी न्यायालयातून बाहेर पडला आणि काही वेळाने स्फोट झाला. सीसीटीव्हीमध्ये हा घटनाक्रम कैद झाल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

व्हॅटिकनच्या भेटीत पोप फ्रान्सिस काय म्हणाले होते, पंतप्रधान मोदींना

‘सत्तेच्या अनेक उलथापालथनंतरही गोवा भारतीयत्व विसरला नाही; भारत गोव्याला विसरला नाही’

गोवा मुक्ती दिनावर बाळासाहेबांनी काढलेले हे भन्नाट व्यंगचित्र

केरळमध्ये पुन्हा फोफावला राजकीय हिंसाचार! १२ तासात २ हत्या

आरोपी कटारिया याचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या वकिलाशी काही वाद आहेत. त्यांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या वैरातूनच कटारिया याने शेजाऱ्याला ठार करण्याचा कट रचला. पोलिसांनी या सर्व तपासानंतर भारतभूषण कटारिया याला अटक केली आहे.

Exit mobile version