संतप्त बदलापूरकरांकडून शाळेची तोडफोड; रेल्वे स्थानकात पोलिसांवर केली दगडफेक

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पालक आणि नागरिकांकडून आंदोलन

संतप्त बदलापूरकरांकडून शाळेची तोडफोड; रेल्वे स्थानकात पोलिसांवर केली दगडफेक

बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पालकांसह बदलापूरकरांचा उद्रेक झाला आहे. मंगळवार, २० ऑगस्ट रोजी सकाळपासूनच बदलापूरमधील स्थानिक नागरिकांनी शाळेला घेरा घातला असून बदलापूर स्थानकातही प्रवाशांनी रेल रोको देखील केला आहे. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी पालकांनी आणि नागरिकांनी लावून धरली आहे. अशातच आता हळूहळू या आंदोलनाला हिंसक वळण मिळत असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून आरोपीला कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. पोलिसांनी देखील आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. दरम्यान, संतप्त नागरिकांनी शाळेचे गेट तोडून आत प्रवेश केला आहे. तसेच शाळेत प्रवेश करून शाळेची तोडफोड करण्यास सुरुवात केली आहे. शाळेच्या खिडकीच्या काचा, बेंचेस यांची तोडफोड केली आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी शाळेच्या परिसरात अश्रूच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, शांततेचे आवाहन करणाऱ्या पोलिसांवर बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलकांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली आहे.

बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. संतापलेल्या पालकांनी मंगळवारी शाळेबाहेर जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. तर, संतप्त जमाव बदलापूर रेल्वे स्थानकात ट्रॅकवर उतरला आहे. शिवाय बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे.

हे ही वाचा..

कासीम पठाणच्या छळास कंटाळून तरुणीची आत्महत्या

कोलकाता पीडितेचा मृतदेह पालकांकडे देण्यास वेळ का लागला?

पोर्शे कार अपघात; रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दोघांना अटक

“बदलापूर अत्याचार प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही”

या प्रकरणानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. शाळेने माफीनामा जाहीर केला असून याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं आहे. तर, मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. प्रशासनाकडूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

Exit mobile version