27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाशाळेत जाणाऱ्या मुलीचा विनयभंग करणारा जेरबंद

शाळेत जाणाऱ्या मुलीचा विनयभंग करणारा जेरबंद

Google News Follow

Related

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनीचा रस्त्यात विनयभंग करणाऱ्या एकाला नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना अंधेरी पूर्व येथे सकाळी घडली.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली.

अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूनम नगर येथून सकाळी ७ वाजता इयत्ता नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनी शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या, त्यावेळी एक इसम त्यांच्या पाठीमागून आला आणि त्याने एका विद्यार्थीनीच्या पाठीवर हात फिरवून तीला अश्लील भाषा वापरली.

हे ही वाचा:

हो हो हो खरंच आता पर्यटकांसाठी मुंबईत हो – हो बस सेवा

रवी दहियाने पाकिस्तानच्या शरीफच्या नाकी’नऊ’ आणत जिंकले सोने

जगदीप धनखड यांनी मोठ्या फरकाने जिंकली उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक

ममता बॅनर्जींचा आदेश दोन खासदारांनी धुडकावला!

 

घाबरलेल्या विद्यार्थीनीनी मदतीसाठी आरडाओरडा करताच स्थानिक नागरिकांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीला पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले. एमआयडीसी पोलिसांनी या इस्माविरुद्ध विनयभंग, बाल लैगिंग प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली अशी माहिती वरिष्ट पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा