मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून ज्येष्ठ उद्योगपती टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना धमकी देणाऱ्या उच्च शिक्षित इसमाला कर्नाटक येथून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.अटक करण्यात आलेली व्यक्ती पुण्यातील भोसरी येथे राहणारा असून तो ‘स्किझोफ्रेनिया’चा रुग्ण असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एका व्यक्तीने गुरुवारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करून “रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा अन्यथा भविष्यात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यासारखी त्यांची अवस्था होईल असा इशारा कॉल करणाऱ्याने दिला होता. या कॉल मुळे मुंबई पोलीस सतर्क झाले व आणि रतन टाटा यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी एक विशेष पथक नेमण्यात आले, तसेच पोलीस पथकाला कॉलरची माहिती गोळा करण्यास सांगण्यात आले.
हे ही वाचा:
हरयाणा करणार इस्रायलसाठी १० हजार कुशल कामगारांची भरती
महिला न्यायाधीशाची मुख्य न्यायाधीश चंद्रचूडांकडे इच्छामरणाची मागणी!
एसआरए सदनिका पाच वर्षांनी विकण्याचा मार्ग मोकळा होणार?
धोनीच्या ७ क्रमांकाच्या जर्सीने ‘पाठ’ सोडली!
पोलिसांनी सांगितले की, त्यांनी तांत्रिक सहाय्याने आणि दूरसंचार सेवा प्रदात्याच्या मदतीने कॉलरचा माग काढला. फोन करणाऱ्याचे लोकेशन कर्नाटकात असल्याचे निष्पन्न झाले असून, तो पुण्याचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी पोहोचले असता, कॉलर गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने भोसरी पोलिस ठाण्यात दिली होती.
कॉलरच्या नातेवाईकाची चौकशी केल्यावर, कॉल करणारा व्यक्तीला स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आले आणि त्याने न कळवता कोणाच्या तरी घरातून फोन घेतला,आणि त्याने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला आणि रतन टाटा यांना धमकावले, अशी माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान एक पथक कर्नाटक येथे रवाना करून कॉल करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले.
अधिकाऱ्याने सांगितले की कॉलर स्किझोफ्रेनियाशी झुंज देत असल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने फायनान्समध्ये एमबीए केले आहे आणि त्याने अभियांत्रिकीचेही शिक्षण घेतले आहे.